AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भवतीच्या हत्याकांडाचा सनसनाटी खुलासा, सैनिक पतीनेच पोलीस भावासह बायकोला संपवलं

मध्य प्रदेशातील इंदौर पोलिसांनी आठ महिन्यांची गर्भवती पूजा अस्के हिच्या हत्याकांडाचं गूढ उकललं आहे. (Madhya Pradesh Murder Husband )

गर्भवतीच्या हत्याकांडाचा सनसनाटी खुलासा, सैनिक पतीनेच पोलीस भावासह बायकोला संपवलं
मयत पूजा अस्के आणि आरोपी पती जितेंद्र
| Updated on: Apr 27, 2021 | 1:31 PM
Share

भोपाळ : इंदौरमधील गर्भवतीच्या हत्या प्रकरणाचा सनसनाटी खुलासा झाला आहे. गर्भवती महिलेची सैनिक पतीनेच हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पतीला त्याच्या दोघा भावांनी हत्येसाठी मदत केली. त्यापैकी एक भाऊ पोलिसात जवान आहे. आठ महिन्यांची गरोदर असलेल्या पूजा अस्के हिची गेल्या आठवड्यात गळा दाबून हत्या करण्यात आली होती. (Madhya Pradesh Pooja Aske Murder Case Commander Husband Police Brother in law arrested)

पती सैन्यात, दीर पोलिसात

मध्य प्रदेशातील इंदौर पोलिसांनी पूजा हत्याकांडाचं गूढ उकललं आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या पूजाचा मारेकरी दुसरा-तिसरा कोणी नाही, तर तिचा पतीच निघाला. पूजाच्या पतीने त्याच्या दोघा धाकट्या भावांसह पत्नीची हत्या केली. त्यानंतर तो साळसूदपणाचा आव आणत राहिला. पूजाचा पती जितेंद्र अस्के 34 व्या बटालियन कंपनीचा कमांडर आहे. तर दीर राहुल अस्के पोलिस जवान आहे. त्याची पोस्टिंग छिंदवाडामध्ये आहे.

मध्य प्रदेशातील इंदौर शहरात मल्हारगंज भागात ही घटना घडली. कमला नेहरु कॉलनीतील रामदुलारी अपार्टमेंटमध्ये गेल्या शनिवारी पूजा उर्फ जान्हवी हिची गळा दाबून हत्या करण्यात आली होती.

दीरावर संशय, पोलिसांकडून चौकशी

या प्रकरणात आधी तिच्या दीराचे नाव समोर आले. पोलिसांनी संशयातून दोन्ही दीरांना ताब्यात घेतले होते. पूजाचा नवरा जितेंद्र स्वतःला निर्दोष असल्याचं भासवत होता. पोलिसांनी दीरांकडे कसून चौकशी केली असता आरोपींनी हत्येची धडाधड कबुली दिली. दादानेच हत्येचा कट रचल्याचं धाकट्या भावांनी सांगितलं.

आरोपी जितेंद्रचा दुसरा विवाह

पूजा ही आरोपी जितेंद्रची दुसरी पत्नी होती. धारमध्ये राहणाऱ्या अनू नावाच्या महिलेसोबत जितेंद्रचा पहिला विवाह झाला होता. तिला जितेंद्रपासून मुलंही आहेत. मात्र ही गोष्ट लपवून जितेंद्रने पूजा उर्फ जान्हवीसोबत दुसरा विवाह केला. पूजाला जितेंद्रच्या खोटारडेपणाविषयी समजताच भयंकर चीड आली. तिने थेट अनूला फोन लावला. त्यावरुन दोघींमध्ये वादावादी झाली. (Madhya Pradesh Pooja Aske Murder Case Commander Husband Police Brother in law arrested)

पहिल्या पत्नीची आत्महत्येची धमकी

अनूने जितेंद्रला फोन करुन मुलांसह आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या जितेंद्रने घरी धाव घेतली. तिथे जितेंद्रचा पोलीस भाऊ राहुल आणि मावसभाऊ नवीन आधीच पोहोचले होते. त्यावेळी तिघांनी मिळून पूजाचा काटा काढण्याचा कट रचला.

राहुल आणि नवीन लगेचच पूजाच्या घरी गेले. तिथे दोघांनी तिची गळा दाबून हत्या केली. पूजाच्या नातेवाईकांनी जितेंद्रवर गंभीर आरोप केले होते. मात्र पोलिसांनी दीर राहुल आणि नवीन यांना अटक केली. जितेंद्रने मात्र आपल्याला काहीच माहित नसल्याचा दावा केला. मात्र चौकशीत दोन्ही भावांनी दादाची पोलखोल केली. पोलिसांनी मुख्य आरोपी जितेंद्र अस्के यालाही बेड्या ठोकल्या आहेत. मल्हारगंज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोना झाल्याच्या रागातून पत्नीची हत्या, स्टेशन मास्तर पतीची आत्महत्या

पाटील दाम्पत्याच्या हत्येचं गूढ पाच दिवसात उकललं, महिलेसह तिघांना अटक

(Madhya Pradesh Pooja Aske Murder Case Commander Husband Police Brother in law arrested)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.