AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Accident | लेकाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतताना दाम्पत्यावर काळाचा घाला, कार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

50 वर्षीय सूर्यकांत पाटील आणि 45 वर्षीय जयश्री पाटील (रा. मेथी मेलकंदावाडी, मु. भालकी, जि. बिदर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचे पुत्र साईनाथ याचा विवाह 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

Latur Accident | लेकाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतताना दाम्पत्यावर काळाचा घाला, कार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 11:14 AM
Share

लातूर : लेकाच्या लग्नाची पत्रिका देऊन घरी परतणाऱ्या आई-वडिलांवर काळाने घाला घातला. जिप उलटून झालेल्या अपघातात वरमाय आणि वरपिता यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री लातूर जिल्ह्यातील बिदर – उदगीर मार्गावर सेवालाल तांड्याजवळ हा अपघात झाला.

50 वर्षीय सूर्यकांत पाटील आणि 45 वर्षीय जयश्री पाटील (रा. मेथी मेलकंदावाडी, मु. भालकी, जि. बिदर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचे पुत्र साईनाथ याचा विवाह 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

नेमकं काय घडलं?

लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी सूर्यकांत पाटील आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील हे दोघे बुधवारी बिदरला गेले होते. आमंत्रण करुन झाल्यानंतर रात्री उशिरा ते भालकीकडे परत येत होते. यावेळी बिदर- उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ त्यांच्या जिपला भीषण अपघात झाला. यामध्ये जिप उलटून पाटील दाम्पत्याला जागीच प्राण गमवावे लागले.

मुलाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न

आई-बाबांना येण्यास उशीर होत असल्याने मुलगा साईनाथने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाईल लागत नसल्याने काहीच बोलणे होत नव्हते. अखेर कुटुंबातील सदस्यांनी रात्रभर त्यांची वाट पाहिली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नघरात ही दुर्दैवी बातमी पोहोचली.

रस्त्याच्या कडेला गाडी उलटून अपघात झाल्याने आई-बाबांचा मृत्यू झाल्याचं पाटील कुटुंबीयांना समजलं. ही घटना कळताच घरावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि भावंडे असा परिवार आहे.

या अपघाताची माहिती मिळता पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांवर मेथी मेलकुंडा वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सूर्यकांत पाटील हे ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष होते.

संबंधित बातम्या :

WhatsApp वर अनोळखी नंबरवरुन मेसेज, अल्पवयीन तरुणी भेटायला, गाडीत बलात्कार

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजारांची लाच, पुण्यात 28 वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षक अटकेत

फेसबुक फ्रेण्डकडून हॉटेल रुममध्ये बलात्कार, अश्लील व्हिडीओ शूट करत 10 लाखांची मागणी

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.