सायकल लावण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये वाद, 35 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

अहमदनगरमध्ये वाळकी येथील दोन शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात एकाचा मृत्यू झाला. जावेद गनीभाई तांबोळी (वय 35 वर्ष) या तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली.

सायकल लावण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये वाद, 35 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या
नगर तालुका पोलीस स्टेशन

अहमदनगर : दोन शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात अहमदनगरमध्ये एकाला प्राण गमवावे लागले. सायकल पार्क करण्यावरुन झालेल्या भांडणानंतर 35 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

अहमदनगरमध्ये वाळकी येथील दोन शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात एकाचा मृत्यू झाला. जावेद गनीभाई तांबोळी (वय 35 वर्ष) या तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना नगर तालुक्यातील वाळकी येथील स्टेट बँकेसमोर चौकात घडली.

नेमकं काय घडलं?

वाळकी येथे शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात सायकल लावण्याच्या कारणावरुन वाद झाले. या वादाच्या रागातून वाळकी येथील भांड्याचे व्यापारी गनीभाई तांबोळी यांचा मुलगा जावेदचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय. या घटनेने वाळकी हादरली असून काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीत पत्नीची डोक्यात वार करुन हत्या

दुसरीकडे, चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी हत्येचा उलगडा करण्यात यश मिळवलं आहे. थेरगावमध्ये 23 सप्टेंबरला बाळासाहेब जाधव याने पत्नी सुनीता जाधवची डोक्यात वार करुन हत्या केली होती

पोलिसांनी अखेर आरोपी बाळासाहेब जाधव याला जेरबंद करत बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी यापूर्वी दोन वेळा घर सोडून पळून गेला होता. त्यावेळी आधी सात वर्ष, तर दुसऱ्या वेळी तीन वर्ष त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. हत्येनंतर मात्र पोलिसांनी त्याला महिन्याभराच्या आत पकडण्यात यश मिळवलं आहे.

संबंधित बातम्या :

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची हत्या, काठीने मारहाण करुन डोक्यात फरशी टाकली

बायकोला छळण्यासाठी नवऱ्याने ‘आत्महत्ये’चा बनावट व्हिडीओ पाठवला, पोलिसांनी बनाव कसा उघड केला?

दोन दिवसांपासून बेपत्ता, शेतातल्या विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह, आत्महत्या की घातपात? पोलिसांपुढे मोठं आव्हान

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI