सावत्र मुलीवर अत्याचार, अहमदनगरमध्ये नराधम बापाला 20 वर्षे सक्तमजुरी

सात वर्षांपासून नराधम सावत्र बाप पीडित मुलीवर अत्याचार करत असल्याचा आरोप होता. मार्च 2019 मध्ये हा प्रकार समोर आला. पीडित अल्पवयीन मुलगी बोल्हेगावात भावासोबत राहत होती.

सावत्र मुलीवर अत्याचार, अहमदनगरमध्ये नराधम बापाला 20 वर्षे सक्तमजुरी
प्रातिनिधीक फोटो

अहमदनगर : सावत्र मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अखेर शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

काय आहे प्रकरण?

सात वर्षांपासून नराधम सावत्र बाप पीडित मुलीवर अत्याचार करत असल्याचा आरोप होता. मार्च 2019 मध्ये हा प्रकार समोर आला. पीडित अल्पवयीन मुलगी बोल्हेगावात भावासोबत राहत होती. तिच्या आई-वडिलांचे एकमेकांसोबत पटत नसल्याने ते दोन वर्षांपासून वेगळे रहात होते.

जीवे मारण्याची धमकी

आरोपीने पत्नीला मारहाण करुन घराबाहेर काढले होते. तेव्हापासून आरोपी पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करत होता. न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी या प्रकरणी निकाल सुनावला. ही घटना उपनगर बोल्हेगाव परिसरात घडली होती. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मनीषा केळगेंद्रे-शिंदे यांनी बाजू मांडली.

वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दरम्यान, वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 33 वर्षीय मिलिंद पांडुरंग राऊत (रा. साबळे लेआऊट, वर्धा) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. छतावर उभी राहून मोबाईलमध्ये गाणे ऐकत असलेली तरुणी एकटी असल्याचे हेरुन आरोपी मिलिंद राऊतने तिचा विनयभंग केला होता.

संबंधित बातम्या :

आजीची हत्या करुन दागिन्यांची चोरी, नांदेडमध्ये पाच दिवसात नातू जेरबंद

दहा दिवसांच्या मुलीचा अडीच लाखांना सौदा, नवी मुंबईत जन्मदात्रीसह पाच जणांना बेड्या

अहमदनगरात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेची हत्या, मध्यरात्री दगड घालून संपवलं

Published On - 3:48 pm, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI