VIDEO | तलवारीने केक कापून वाढदिवसाचे सेलिब्रेशन, औरंगाबादेत बर्थडे बॉयला अटक

हर्षदने तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ स्टेटसवर ठेवला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. या प्रकरणी शस्त्रबंदी कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

VIDEO | तलवारीने केक कापून वाढदिवसाचे सेलिब्रेशन, औरंगाबादेत बर्थडे बॉयला अटक
तलवारीने केक कापणारा बर्थडे बॉय अटकेत

औरंगाबाद : तलवारीने केक कापून बर्थडे सेलिब्रेट करणं तरुणाच्या अंगलट आलं आहे. औरंगाबादमध्ये बर्थडे बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. तलवारीने केक कटिंग करतानाचा व्हिडीओ तरुणाने स्टेटसवर ठेवला होता.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद शहरातील जुना मोंढा परिसरात हा प्रकार घडला. धारदार तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. बावीस इंची धारदार तलवार घेऊन हर्षद रोहिदास गोरमे या आरोपीने जुना मोंढा परिसरामध्ये वाढदिवसाचा केक कापला होता.

व्हिडीओ व्हायरल

हर्षदने याचा व्हिडिओ स्टेटसवर ठेवला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. या प्रकरणी शस्त्रबंदी कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तलवारीने केक कापून त्याचे स्टेटस ठेवल्यामुळे परिसरात खळबळ पसरली होती.

पाहा व्हिडीओ :

डीजेच्या दणदणाटात तलवारीने केक कटिंग

दुसरीकडे, रोहन बेल्हेकर नावाच्या तरुणाने गेल्या वर्षी धुमधडाक्यात डीजेच्या दणदणाटात वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवस साजरा होत असताना रोहन बेल्हेकर याने तलवारीने केक कापला. केक कापलेले फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. वाढदिवस करताना तलवारीसारख्या घातक हत्याराचा वापर केला आणि गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, म्हणून पोलिसांनी बर्थडे बॉय रोहन बेल्हेकरवर गुन्हा दाखल केला होता.

संबंधित बातम्या :

बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यात गुंडाचा धिंगाणा, रस्त्यात गाणी लावून बर्थडे सेलिब्रेशन

सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा, पुण्यात तरुणाला अटक

VIDEO | बायकोसमोर शाईनिंग, लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला, नवरोबाला बेड्या

Published On - 9:55 am, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI