24 तासात एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, रखडलेल्या पगारामुळे आयुष्य संपवल्याचा आरोप

मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

24 तासात एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, रखडलेल्या पगारामुळे आयुष्य संपवल्याचा आरोप
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 2:35 PM

बीड/पंढरपूर : राज्याच्या दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पगार वेळेवर न झाल्याने बीड आगारातील बस चालकाने गळफास घेतला. तर पंढरपुरातही एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, मात्र त्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बीडमध्ये एसटी चालकाची आत्महत्या

पगार वेळेवर न झाल्याने बीड आगारातील चिंताग्रस्त बस चालकाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. महिन्याच्या सात तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार होत असतो, परंतु गेल्या काही महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्याने येथील अनेक कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यातील एका वाहन चालकाने 11 ऑक्टोबर रोजी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान 12 ऑक्टोबर रोजी राज्य परिवहन महामंडळाने रखडलेले वेतन जारी केल्याची घोषणा केली. त्यापूर्वीच या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याचा गळफास

दुसरीकडे, पंढरपुरातही एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. एसटी आगारातील दशरथ गिड्डे या कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच गिड्डे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते. कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एसटी विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

अहमदनगरमध्ये एसटी ड्रायव्हरची आत्महत्या

याआधीही एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात बसमध्येच ड्रायव्हरने आपलं आयुष्य संपवलं होतं. कर्जबाजारीपणातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती.

नेमकं काय घडलं?

संगमनेर बस स्थानकात एसटी बसमध्येच चालकाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पाथर्डी-नाशिक बसच्या वाहन चालकाने बसमध्येच गळफास घेतला होता. पाथर्डी बस स्थानकातील चालक सुभाष तेलोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच त्यांनी सकाळी गळफास घेतल्याचा आरोप झाला होता.

डोक्यावर कर्ज वाढल्याने सुभाष तेलोरे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात डिझेल नसल्याने नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच त्यांनी सकाळी गळफास घेतला.

धुळ्यात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

दुसरीकडे, पगार वेळेवर होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी (राज्य परिवहन मंडळ) चालकाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री इथे घडली. आधीच तुटपुंजा पगार आणि तोही अनियमित असल्यामुळे शेवटी कंटाळून कमलेश बेडसे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले होते. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

संबंधित बातम्या :

एसटी चालकाची बसमध्येच आत्महत्या, बॅगच्या बेल्टने गळफास

पगार न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, एसटी संघटनेकडून आंदोलनाची हाक

घरदार, पोटपाणी जिच्यावर चालत होतं, त्याच एसटीत चालकाचा गळफास, एसटीला गाळातून कोण बाहेर काढणार?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.