AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगा कुलूप उघडून घरात, आई मृतावस्थेत, जळगावातील हत्येचं गूढ काही तासात उलगडलं

गुरुवारी दुपारच्या सुमारास सुनिता महाजन या आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. सुनिता यांचा मुलगा दुपारी कामावरुन घरी आला तेव्हा घराचा दरवाजा बाहेरुन बंद होता.

मुलगा कुलूप उघडून घरात, आई मृतावस्थेत, जळगावातील हत्येचं गूढ काही तासात उलगडलं
महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतलाImage Credit source: tv9
| Updated on: Mar 04, 2022 | 11:07 AM
Share

जळगाव : विवाहित महिला राहत्या घरात (Married Lady Dead Body) रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळल्याने एकच खळबळ उडाली. घराच्या दरवाजाला बाहेरुन कुलूप असल्यामुळे हत्येचं गूढ आणखी वाढलं होतं. जळगाव (Jalgaon Crime) जिल्ह्यातील सप्तश्रृंगीनगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचा मुलगा ऑफिसहून घरी आला, तेव्हा त्याला आपली आई मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास केला असता पतीनेच विवाहितेची हत्या (Murder) केल्याचं समोर आलं. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. डोक्यात लाकडी पाटीने वार करुन पत्नीची हत्या केल्याची कबुली पतीने दिली आहे. सुनिता संजय महाजन असं 46 वर्षीय मयत महिलेचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

गुरुवारी दुपारच्या सुमारास सुनिता महाजन या आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. सुनिता यांचा मुलगा दुपारी कामावरुन घरी आला तेव्हा घराचा दरवाजा बाहेरुन बंद होता. दरवाजाचे कुलूप उघडून सुनिता यांच्या मुलाने घरात प्रवेश केला तेव्हा, घरात सुनिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या.

मुलाने आरडाओरड केल्यावर शेजाऱ्यांची गर्दी जमा झाली. डॉक्टरांनी सुनिता महाजन यांना तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.

अवघ्या काही तासांतच आरोपी जेरबंद

महिलेची हत्या करुन घराला बाहेरुन कुलूप लावून पळणारा व्यक्ती हा महिलेच्या परिचयाचा असावा असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी आपला तपास केला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच आरोपीचा तपास लागला.

पोलिसांनी मृत महिलेच्या पतीची माहिती काढून त्याची विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पतीनेच हत्या केल्याचं तपासात उघड झालं. चारित्र्याच्या संशयातून पत्नीची डोक्यात लाकडी पाटीने वार करुन हत्या केल्याची कबुली आरोपी पती संजय महाजन याने दिली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

42 वर्षीय महिला राहत्या घरी मृतावस्थेत, मुलगा म्हणतो आईसोबत राहणाऱ्या पार्टनरने तिला संपवलं

 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी सुनेची हत्या?; पोलीस अधिकाऱ्याला मुलासह अटक

Uttar Pradesh Murder : लग्नात झालेल्या भांडणाचा दोन वर्षांनी हत्या करुन घेतला बदला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.