Latur Murder and Suicide | पुतणीला त्रास देणाऱ्या जावयाची लॉजमध्ये हत्या, चुलत सासऱ्याचा गळफास

भावाच्या मुलीला तिचा नवरा सतत त्रास देत असे, या गोष्टीचा संताप आरोपीच्या मनात होता. या कारणावरुन चुलत सासऱ्याने जावई उमेश देशमुख यांना मारहाण केली. 37 वर्षीय जावयाला रॉडने बेदम मारहाण करण्यात आली होती, यात त्यांचा मृत्यू झाला.

Latur Murder and Suicide | पुतणीला त्रास देणाऱ्या जावयाची लॉजमध्ये हत्या, चुलत सासऱ्याचा गळफास
लातूरमध्ये हत्या-आत्महत्येचं प्रकरण उघड
महेंद्र जोंधळे

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 15, 2021 | 7:58 AM

लातूर : पुतणीला त्रास देणाऱ्या जावयाची चुलत सासऱ्यानेच हत्या (Latur Murder) केली. लातूर शहरातील साईधन लॉजमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे जावयाच्या हत्येनंतर सासऱ्यानेही गळफास घेऊन आत्महत्या (Father in Law Suicide) केली आहे.

काय आहे प्रकरण?

भावाच्या मुलीला तिचा नवरा सतत त्रास देत असे, या गोष्टीचा संताप आरोपीच्या मनात होता. या कारणावरुन चुलत सासऱ्याने जावई उमेश देशमुख यांना मारहाण केली. 37 वर्षीय जावयाला रॉडने बेदम मारहाण करण्यात आली होती, यात त्यांचा मृत्यू झाला.

जावयाच्या हत्येनंतर सासऱ्याचा गळफास

जावयाचा जीव घेतल्यानंतर चुलत सासऱ्यानेही आत्महत्या केली. 40 वर्षीय आरोपी शिवाजी शिंदे याने यानेही लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे.

कॉम्प्युटर ऑपरेटरमुळे प्रकरण उघड

दरम्यान, विवेकानंद चौक पोलीस आता या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. जावयाच्या हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यासाठी एका कॉम्प्युटर ऑपरेटरला बोलवण्यात आले होते. त्याने हे दृश्य पहिल्यानंतर स्वतः पोलिसांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

अनैतिक संबंधातून महिलेकडून प्रियकराचीच हत्या!, लातूरमधील धक्कादायक घटना

नांदेडमधील ऑनर किलिंग प्रकरणी आरोपीला फाशीच, हायकोर्टाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब

बीडमध्ये गुंडांची दहशत, दिवसाढवळ्या तरूणावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें