AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवान दत्ताचा अवतार सांगत मुंबई-पुण्यात गंडा, लाखो रुपये उकळणारा भोंदूबाबा जेरबंद

असाध्य आजार बरे करुन देण्याचा दावा हा भोंदूबाबा करत असे, तसेच नोकरी लावून देणे, कौटुंबिक कलह दूर करून देण्याचा दावाही नांदेडमधील भोंदूबाबा करत होता.

भगवान दत्ताचा अवतार सांगत मुंबई-पुण्यात गंडा, लाखो रुपये उकळणारा भोंदूबाबा जेरबंद
नांदेडमध्ये भोंदूबाबाला अटक
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 11:26 AM

नांदेड : भगवान दत्ताचा अवतार असल्याचे सांगत अनेकांना गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाला माहूर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. विश्वजीत कपिले असे या भोंदू बाबांचे नाव असून त्याने मुंबईसह पुण्यातील अनेकांना गंडा घातला आहे. हा भोंदू बाबा स्वतःची देवाप्रमाणे पूजा अर्चना आपल्या भोळ्या भक्तांकडून करवून घेत असे, याचे व्हीडिओ शूटिंग भक्तांनीच पोलिसांना उपलब्ध करून दिले.

काय आहे प्रकरण?

असाध्य आजार बरे करुन देण्याचा दावा हा भोंदूबाबा करत असे, तसेच नोकरी लावून देणे, कौटुंबिक कलह दूर करून देण्याचा दावाही हा बाबा करत होता. त्यासाठी अघोरी पूजा करायला तो भक्तांना सांगत असे, त्यासाठी भाविकांकडून लाखो रुपये देखील महाराजाने उकळले आहेत.

डोंबिवलीतील व्यक्तीकडून चोवीस लाख उकळले

मांडूळ, कासवाची पूजा करण्याच्या नावाखाली तो फसवणूक करत होता. या प्रकरणी डोंबिवली इथल्या प्रवीण शेरकर यांच्या तक्रारी वरून माहूर पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. एकट्या शेरकर यांच्याकडून या भोंदू बाबाने चोवीस लाख रुपये उकळल्याची तक्रार आहे.

या भोंदू बाबाने चक्क दत्त शिखर देवस्थानावर आपला बाजार मांडला होता, मात्र त्याची भोंदूगिरी लक्षात येताच देवस्थानने त्याला हाकलून दिले होते. आता रात्री या बाबाला अटक करण्यात आले असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या खळबळजनक प्रकाराने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

पुण्यात भोंदूबाबाच्या आदेशाने विवाहितेचा जाच

याआधी, दोन्ही मुली झाल्या आणि सासू-सासऱ्यांनी लग्नात योग्य मानपान केला नाही, याचा राग मनात धरुन पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली होती. मुलगा होण्यासाठी कामशेतमधील भोंदूबाबासमोर बसवून महिलेला अंगारा खायला लावल्याचाही आरोप झाला होता. तर घरी नेऊन नग्नावस्थेत महिलेच्या शरीरभर अंगारा फासल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

पूजेच्या नावाखाली बोलावून बलात्कार, महिला भक्ताच्या आरोपानंतर मुंबईत भोंदूबाबाला बेड्या

मुंबईत 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार, भोंदूबाबाला अटक

गुप्तधन आणि पुत्रप्राप्तीचे आमिष, भोंदूबाबाकडून एका मुलीवर बलात्कार, कुटुंबातील तिघींचा विनयभंग

अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्....
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?.
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP.
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?.
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO.
अहमदाबादेत विमान कसं कोसळलं? काय घडलं? किती होते भारतीय प्रवासी?
अहमदाबादेत विमान कसं कोसळलं? काय घडलं? किती होते भारतीय प्रवासी?.
अपघातानंतर विमान थेट वसतिगृहावर कोसळलं अन्..
अपघातानंतर विमान थेट वसतिगृहावर कोसळलं अन्...
पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना
पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना.
कल्याणमध्ये जलवाहिनी फुटली, सुविधा न देता KDMC टँकर माफियाच्या पाठीशी?
कल्याणमध्ये जलवाहिनी फुटली, सुविधा न देता KDMC टँकर माफियाच्या पाठीशी?.