ज्वेलरच्या दुकानातून 20 तोळे सोन्यासह कामगार पसार, कोलकात्यातून दोघांना अटक

सांगलीच्या आदिनाथ चेन्स गणपती पेठ या दुकानात काम करणारा गलाई कामगार 18 ते 20 तोळे सोने घेऊन पसार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सांगली शहर पोलिसांनी त्या फरार कामगारांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीला मुंबईतून ताब्यात घेतले

ज्वेलरच्या दुकानातून 20 तोळे सोन्यासह कामगार पसार, कोलकात्यातून दोघांना अटक
सांगलीत ज्वेलरच्या दुकानात चोरी

सांगली : सांगलीतून सोने घेऊन पळून गेलेल्या कामगारासह दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये चोरीचे 9 तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सांगली शहर पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई केली.

काय आहे प्रकरण?

सांगलीच्या आदिनाथ चेन्स गणपती पेठ या दुकानात काम करणारा गलाई कामगार 18 ते 20 तोळे सोने घेऊन पसार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सांगली शहर पोलिसांनी त्या फरार कामगारांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीला मुंबईतून ताब्यात घेतले, त्यावेळी आरोपी हा पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे गेल्याची माहिती मिळाली.

आरोपींना पश्चिम बंगालमध्ये बेड्या

यानंतर सांगली शहर पोलिसांचे तपास पथक हे पश्चिम बंगाल येथे आरोपी कामगाराच्या शोधासाठी गेले. तांत्रिक पद्धतीने तपास करत असताना आरोपी सुकुर अली शहा आणि त्याचे साथीदार राज भोला बाग आणि राहुल रबी टंटी यांना चंडीताला, कोलकाता येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

वीसपैकी 9 तोळे सोने जप्त

आरोपींकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली. तसेच गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 9 तोळे सोने (एकुण 2 लाख 25 हजार रुपये किंमतीचे) त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.

सांगलीत बोकडचोराला अटक

नुकतेच सांगलीच्या इस्लामपूरमध्ये अट्टल सोनसाखळी आणि बोकड चोरट्याला अटक करण्यात आली आहे. अक्षय शिवाजी पाटील (राहणार सातारा) याला इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल हस्तगत करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ चोऱ्या, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी, तसेच शेळ्या, बोकड चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. त्याचा तपास इस्लामपूर पोलिसांकडून सुरु होता. पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत संबंधित आरोपीची माहिती मिळाली होती. त्यानंतर अक्षय शिवाजी पाटील याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याची कसून चौकशी केली असता इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतून जनावर चोरी आणि विविध ठिकाणी चैन स्नॅचिंग केल्याची कबुली त्याने दिली

संबंधित बातम्या :

दारुच्या नशेत 32 वर्षीय तरुणाची पित्याला बेदम मारहाण, औरंगाबादेत वृद्धाचा मृत्यू

सोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा

नवी मुंबईत मौजमस्ती करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI