मिरजेच्या अपेक्स केअर सेंटरमधील 87 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यू प्रकरणी 16 वी अटक, छातीरोग तज्ज्ञाला बेड्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मिरजेतील अपेक्स केअर सेंटर या रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

मिरजेच्या अपेक्स केअर सेंटरमधील 87 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यू प्रकरणी 16 वी अटक, छातीरोग तज्ज्ञाला बेड्या
सांगलीतील अपेक्स केअर हॉस्पिटल

सांगली : 87 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी मिरजच्या अपेक्स केअर रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सांगलीतील छातीरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश बरफे याला महात्मा गांधी चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात 16 जणांना अटक करण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मिरजेतील अपेक्स केअर सेंटर या रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

काय आहे प्रकरण?

व्हेंटिलेटर नसतानाही ते दाखवून उपचार करण्याबरोबर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने 87 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महेश जाधव यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, महेश जाधव याचा डॉक्टर भाऊ, एजंट अशा 15 जणांना अटक केली होती.

डॉक्टर शैलेश बरफे होते फरार

यामध्ये सांगलीतील छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश बरफे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यानंतर डॉ. बरफे हे फरार होते. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला होता, मात्र तो न्यायालयाने फेटाळून लावला होता. आणि सोमवारी रात्री उशिरा महात्मा गांधी चौकी पोलिसांनी डॉ. बरफे यांना अटक केली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

महापालिका वैद्यकीय अधिकारी सुनील आंबोळे यांनी मिरजेतील अपेक्स हॉस्पिटलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. डॉ. महेश जाधवसह सात जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुद्द्यावरून सांगली महापालिका क्षेत्रातल्या खाजगी रुग्णालयात झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत संघर्ष सफाई कर्मचारी आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना महापालिका क्षेत्रातल्या सर्व खाजगी रुग्णालयात झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या सीआयडी चौकशीची मागणी केली होती.

पुण्याकडे पसार होण्याच्या प्रयत्नात असताना डॉक्टर जाधवला अटक

डॉ. महेश जाधव याच्या रुग्णालयात कोरोना नियमावलीप्रमाणे उपचार करण्यात आले नाही. कोणत्याही प्रकारचे व्हेंटिलेटर आणि अद्यावत अशी सुविधा उपलब्ध नसताना देखील अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय शिकाऊ डॉक्टरांच्या निगराणीखाली हे सगळे उपचार करण्यात येत होते. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. त्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी डॉक्टर महेश जाधव यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याकडे पसार होणार्‍या डॉ. महेश जाधव याला कासेगाव या ठिकाणी ताब्यात घेऊन 18 जून रोजी अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

80 रुग्णांच्या मृत्यूला डॉ. महेश दुधनकर जबाबदार, सांगलीत आणखी एका डॉक्टरवर आरोप, राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, तिघा अॅम्ब्युलन्स चालकांना अटक, आरोपींचा आकडा 13 वर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI