दोन रुग्णांमध्ये राडा, सलाईनच्या रॉडने मारहाणीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

सोमवारी रात्री आरोपीने वृद्ध रुग्णाला सलाईनच्या रॉडने मारहाण केली, यात तो जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी ट्रॉमा केअर येथे दाखल करण्यात आले होते, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दोन रुग्णांमध्ये राडा, सलाईनच्या रॉडने मारहाणीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
सोलापुरात रुग्णाची हत्या


सोलापूर : सोलापुरातल्या श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका रुग्णाने सलाईनच्या रॉडने मारहाण करुन दुसऱ्या रुग्णाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला असून उपचारादरम्यान 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे,

काय आहे प्रकरण?

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉक मधील हा धक्कादायक प्रकार आहे. गेल्या काही महिन्यापासून 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बेघर असलेल्या 70 वर्षीय वृद्धाला उपचारासाठी दाखल केले. याच वॉर्डात फुप्फुसाच्या विकारावर इलाज करण्यासाठी युसूफ पिरजादे या रुग्णाला दाखल करण्यात आले होते.

नेमकं काय घडलं?

सोमवारी रात्री याच युसूफ पिरजादेने वृद्धाला सलाईनच्या रॉडने मारहाण केली, यात तो जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी ट्रॉमा केअर येथे दाखल करण्यात आले होते, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

रुग्णांची दाटीवाटी, वादविवादाच्या घटना

दरम्यान या साऱ्या प्रकारामुळे सिव्हिल हॉस्पिटल मधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, कोव्हीड आणि इतर साथीच्या रोगांमुळे सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे, त्यातच सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून बिगर लोकांची सोय करण्यात येत नाही, त्यामुळे वार्डात रुग्ण दाटीवाटीने राहतात, घाणीचे साम्राज्य पसरून अनेक वादविवादाच्या घटना घडत असतात, त्यातूनच अशा प्रकारची धक्कादायक घटना झाल्याची सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील एका रुग्णालयात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. एक रुग्ण आपल्या बेडवर झोपल्याचा राग आल्याने दुसऱ्या रुग्णाने त्याची रुग्णालयातच हत्या केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती.

पोटात दुखू लागल्याने हंसराज नावाच्या रुग्णाला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला होल्डिंग एरियामध्ये भर्ती करण्यात आलं होतं. त्याला बेड नंबर 21 देण्यात आला होता. हंसराज मनोरुग्ण असल्याचंही सांगितलं जातं. तर आरोपी रुग्ण अब्दुल रहमान याला बेड नंबर 27 वर भर्ती करण्यात आलं होतं.

बेड नंबर विसरला अन्…

रहमान सकाळी वॉशरुममध्ये गेला होता. परत आला तेव्हा तो त्याचा बेड नंबर विसरला होता. त्यावेळी त्याला एका बेडवर हंसराज पहुडलेला दिसला. त्यामुळे रहमानला हाच आपला बेड असल्याचं वाटलं आणि त्याने हंसराजशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हंसराजने आपल्या बेडचा जबरदस्ती ताबा घेतल्याचा आरोपही त्याने केला. शाब्दिक चकमकी वाढल्याने संतप्त झालेल्या रहमानने हंसराजला बेडवरून उचलून जमिनीवर आपटले. त्यामुळे हंसराजचा जागीच मृत्यू झाला.

दोघांना अटक

यावेळी मृताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप ठेवत रुग्णालयात एकच गोंधळ घातला. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

संबंधित बातम्या :

रुग्ण बेडवर झोपल्याचा राग अनावर, दुसऱ्या रुग्णाकडून हत्या; यूपीतील धक्कादायक प्रकार

अकोल्यात कोव्हिड वॉर्डमधील रुग्णाची सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI