बेटा आय मिस यू, व्हॉट्सअपवर स्टेटस, सासरच्या जाचाला कंटाळून जावयांची आत्महत्या

माझ्या बकऱ्या विकून येतील ते पैसे मुलगा आणि मुलीच्या नावावर करा, हीच माझी शेवटची इच्छा आहे, असं लिहित एका जावयाने आपलं आयुष्य संपवलं. एकाच दिवशी जळगावात अशा दोन घटना समोर आल्या आहेत.

बेटा आय मिस यू, व्हॉट्सअपवर स्टेटस, सासरच्या जाचाला कंटाळून जावयांची आत्महत्या
crime

जळगाव – पत्नी आणि सासुरवाडीच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून दोन जावयांनी आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना एकाच दिवशी जळगाव जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत. दोन्ही तरुणांनी आपापल्या घरात गळफास घेत आयुष्य संपवल्याची माहिती आहे.

सासू-सासऱ्यांवर घणाघाती आरोप

सासू आणि सासरे यांच्यामुळे मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. ते मला सतत त्रास देताता आणि फोनवरुन धमकावतात. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. माझ्या बकऱ्या विकून येतील ते पैसे मुलगा आणि मुलीच्या नावावर करा, हीच माझी शेवटची इच्छा आहे, असं लिहित एका जावयाने आपलं आयुष्य संपवलं.

राहत्या घरात गळफास

32 वर्षीय अमोल प्रकाश धनगर (रा. शिरसोली प्र. न.) असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा बकऱ्यांचा व्यवसाय होता. अमोलने राहत्या घरात गळफास घेत आयुष्याची अखेर केली.

सोशल मीडियावर स्टेटस

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर स्टेटस ठेवत आय मिस यू बेटा असं लिहिल्याची माहिती आहे. अमोलची पत्नी गेल्या एक ते दीड महिन्यांपासून दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली आहे. रविवारी पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास अमोलचे वडील प्रकाश धनगर घरी आले असता अमोल त्यांना छताच्या हुकाला दोरी बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळला.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिस शेख यांनी पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर अमोलचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

27 वर्षीय तरुणाचीही आत्महत्या

दुसऱ्या घटनेत जळगाव शहरात राहणाऱ्या 27 वर्षीय पंकज उखर्डू खाचणे या तरुणाने आत्महत्या केली. आई बाजारात गेली असताना राहत्या घरी त्याने गळफास घेतला. रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास गोपाळपूर भागात ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. सासरच्या जाचाला कंटाळून पंकजने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या :

रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकून जखमी बाईकस्वाराचा मृत्यू, उपचारादरम्यान अखेरचा श्वास

प्रेयसीच्या बापाकडून प्रियकराचा सिनेस्टाईल खून, मृतदेह शेतात पुरला, महिन्याभराने उलगडा

अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमात तरुण वेडापिसा, गळा चिरुन पत्नीची हत्या

Published On - 10:41 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI