AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकून जखमी बाईकस्वाराचा मृत्यू, उपचारादरम्यान अखेरचा श्वास

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्यावर रविकांत तुपकर यांची इनोव्हा गाडी आणि मोटारसायकलचा समोरासमोर अपघात झाला होता. ही दुचाकी भरधाव वेगाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती.

रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकून जखमी बाईकस्वाराचा मृत्यू, उपचारादरम्यान अखेरचा श्वास
रविकांत तुपकर आणि त्यांची अपघातग्रस्त कार
| Edited By: Anish Bendre | Updated on: Nov 29, 2021 | 9:53 AM
Share

बुलडाणा : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे’ नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या बाईकस्वार युवकाचा अखेर मृत्यू झाला. बुलडाण्यात झालेल्या अपघातातील जखमी तरुणावर औरंगाबाद येथे उपचार सुरु होते. या अपघातात रविकांत तुपकर यांना कुठलीही गंभीर दुखापत झाली नव्हती.

नेमकं काय घडलं होतं?

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्यावर रविकांत तुपकर यांची इनोव्हा गाडी आणि मोटारसायकलचा समोरासमोर अपघात झाला होता. ही दुचाकी भरधाव वेगाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान, दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी तुपकरांच्या गाडीला येऊन धडकली. या अपघातामध्ये मोटारसायकलवरील दोघे जण जखमी झाले होते.

दोघेही येवता येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातात रविकांत तुपकर यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले. पण तुपकर आणि त्यांचा ड्रायव्हर यांना दुखापत झाली नव्हती.

तुपकरांची धावाधाव, रुग्णालयात व्यवस्था

यावेळी रविकांत तुपकर यांनी स्वतः धावाधाव करत जखमींना औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. मात्र उपचार सुरु असताना यातील जखमी तरुणाची प्राणज्योत मालवली. तुषार परिहार असे मृत्युमुखी पडलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव आहे. तर दुसरा जखमी गजानन सोळंकी हा उपचार घेऊन घरी परतला.

मुंबईतील बैठकीला जाताना अपघात

मुंबई येथे सोयाबीन- कापुसप्रश्नी उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आयोजित असलेल्या बैठकीला जात असताना रविकांत तुपकरांच्या गाडीला 22 नोव्हेंबरच्या रात्री हा अपघात झाला होता. भरधाव वेगाने रस्ता ओलांडताना दुचाकी आणि तुपकर यांची इनोव्हा कार समोरासमोर धडकली होती.

संबंधित बातम्या :

Ravikant Tupkar Accident | शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात, दुचाकीस्वार येऊन धडकले

Swabhimani Protest | स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण, अज्ञातांकडून बुलडाणा तहसीलदार यांची जीप जाळण्याचा प्रयत्न

Follow Us
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट...
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर... पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न