GF ला कॉल गर्ल बनवायचं होतं; नकार दिल्यावर बॉयफ्रेंडने थेट…
बाळाच्या जन्मानंतर पुष्पा ही तिच्या पतीपासून वेगळी झाली होती. त्यानंतर काही महिन्यांपासून ती आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र एक दिवस त्याने अचानक...

कधी एखादी महिला नवऱ्याचा खन करते, तर कधी प्रियकर प्रेयसीला संपवतो. प्रेम-प्रकरणामधील हत्या, खुनाच्या घटना गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढल्या असून हादरवणारे एकेक तपशील समोर येत आहेत. त्यातच आता आंध्र प्रदेशात एका तरुणाने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. त्यामागचं कारण तर अधिकच हादरवणारं आहे. प्रेयसीने कॉल गर्ल बनण्यास, वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्याने तरुणाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील राजोलू मंडळातील सिद्धार्थ नगर, बी. सावराम गावातील आहे.
मृत महिलेचे नाव पुष्पा आहे. ती अवघ्या 22 वर्षांची होती असे सांगितले जात आहे. तिचे पूर्वी कोणाशी तरी लग्न झाले होते, परंतु ती तिच्या पतीपासून वेगळी झाली होती. गेल्या 6 महिन्यांपासून पुष्पा बी शेख शम्मा नावाच्या तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.
वेश्याव्यवसायासाठी टाकत होता दबाव
कथितरित्या, त्या तरुणाने त्याच्या प्रेयसीला, पुष्पा हिला वेश्याव्यवसायासाठी विचारले, परंतु तिने त्याला नकार दिला. महिलेने वारंवार नकार देऊनही, तिचा लिव्ह-इन पार्टनर असलेल्या पुष्पा बी शेख शम्मा याने तिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिने त्याचंकाहीच ऐकलं नाही आणि ती वारंवार नकार देत होती. बुधवारी रात्री त्याने पुष्पाशी बोलत तिच्यावर पुन्हा वेश्याव्यवसाय करण्यास दबाव टाकला, मात्र त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. याच वेळी संतापलेल्या शम्माने पुष्पावर चाकूने जोरदार हल्ला केला. त्यामध्ये तिच्या छातीवर आणि पायांवर गंभीर जखमा झाल्या. अतिरक्तस्त्रावामुळे पुष्पाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पोलिसांनी काय सांगितलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या जन्मानंतर पुष्पा ही तिच्या पतीपासून वेगळी झाली होती. त्यानंतर काही महिन्यांपासून ती आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यामुळे तिच्या लिव्ह-इन पार्टनरने तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला दारूचे व्यसन होते आणि तो अनेकदा महिलेवर विश्वासघाताचा संशय घ्यायचा असं डीएसपीने सांगितलं.
ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी पुष्पा ही तिच्या आईच्या घरी होती. आरोपीही तिथे उपस्थित होता. त्याने महिलेला वेश्याव्यवसायासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे, ज्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर आरोपीने महिलेच्या आई आणि भावावर देखील हल्ला केला. ते पाहून पुष्पाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने उलट तिच्यावरच हल्ला करून तिची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली.
