AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाइन चिकन बिर्याणी मागवणं महागात पडलं, पॅकेट उघडल्यावर आतमध्ये….

नवाबांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादमधून एका हैराण करणारी बातमी समोर आली आहे. तेथील चिकन बिर्याणी खूप फेमस आहे. पण तीच बिर्याणी मागवणं एका इसमाला खूप महागात पडलं

ऑनलाइन चिकन बिर्याणी मागवणं महागात पडलं, पॅकेट उघडल्यावर आतमध्ये....
| Updated on: Dec 05, 2023 | 1:50 PM
Share

हैदराबाद | 5 डिसेंबर 2023 : नवाबांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादमधून एका हैराण करणारी बातमी समोर आली आहे. तेथील चिकन बिर्याणी खूप फेमस आहे. पण तीच बिर्याणी मागवणं एका इसमाला खूप महागात पडलं.  भूक लागली म्हणून एका इसमाने झोमॅटोवरून चिकन बिर्याणी मागवली, थोड्याच वेळात ती घरी डिलीव्हरही झाली. पण जेव्हा त्या व्यक्तीने पॅकेट उघडलं, तेव्हा समोरचं दृश्य पाहून तो बिथरलाच. कारण पॅकेटधील बिर्याणीत त्याला चक्क मेलेली पाल सापडली.

ई….. वाचूनच कसंतरी झालं ना, पण हे खरं आहे. बिर्याणीमध्ये मेलेली पाल सापडल्यानंतर त्या माणसाने X (पूर्वीचं ट्विटर) या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर एक पोस्टही केली. झोमॅटो डिलीव्हरी बॉय चिकन बिर्याणीसोबत मेलेली पालही घेऊन आला, असं त्याने लिहीलं होतं.

बिर्याणीत पाल सापडल्याने माजला गदारोळ

हैदराबादमधील डीडी कॉलनी येथे राहणाऱ्या इसमाने बावर्ची हॉटेलमधून ऑनलाइन चिकन बिर्याणी मागवली होती. पण पार्सल उघडल्यानंतर त्या बिर्याणीमध्ये मेलेली पाल सापडल्याने घरातील सगळेच हैराण झाले. हॉटेलच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केली. असा अनुभव आल्यानंतर पुढल्या वेळेस ऑनलाइन जेवण मागवण्याआधी ते किमान १० वेळा तरी विचार करतील.

झोमॅटोने दिला रिस्पॉन्स

यासंदर्भातील पोस्ट ऑनलाइन शेअर केल्यानंतर झोमॅटोतर्फे त्यावर उत्तरही देण्यात आलं. ‘ ही अतिशय गंभीर बाब असून आम्ही त्याची दखल घेतली आहे. संबंधित कस्टमरशी आमचं बोलणं झालं आहे. यापुढे असा प्रकार अथवा अशी चूक घडू नये यासाठी आम्ही काळजीपूर्वक पावले उचलू ‘ असे स्पष्टीकरण झोमॅटोतर्फे देण्यात आले. सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली असून नेटीझन्स त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

झुरळामुळे ‘बडेमिया’च्या कोट्यवधींच्या व्यवसायाला ब्रेक

मुंबईमधील नामांकित हॉटेलांपैकी एक असेलल्या बडे मिया हॉटेलला टाळा लागलं. 1946 साली अवघ्या 20 रूपयांमध्ये सुरु झालेलं हॉटेल आज कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. मात्र एका झुरळाने व्यवसायासाला ब्रेक लागला.

‘बडे मिया’ हॉटेलला सील करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांनाच नाहीतर सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला. कारण हॉटेलच्या किचनमध्ये उंदीर आणि झुरळांचा वावर निदर्शनास आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून छापेमारी करण्यात आली. त्यामुळे गेल्या पिढ्यानपिढ्या सुरू असलेलं बडे मिया हॉटेलला आता कुलूप लागलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.