VIDEO : माथेफिरुचा बसस्थानकात कपडे काढून धिंगाना, प्रवाशांची तारांबळ, संबंधित प्रकार कॅमेऱ्यात कैद

सांगलीच्या विटा बसस्थानक परिसरात एक अजबच घटना घडली. एकाने चक्क आपल्या अंगावरील कपडे काढून बसस्थानकात धिंगाना घातला.

VIDEO : माथेफिरुचा बसस्थानकात कपडे काढून धिंगाना, प्रवाशांची तारांबळ, संबंधित प्रकार कॅमेऱ्यात कैद
माथेफिरुचा बसस्थानकात कपडे काढून धिंगाना

सांगली : सांगलीच्या विटा बसस्थानक परिसरात एक अजबच घटना घडली. एकाने चक्क आपल्या अंगावरील कपडे काढून बसस्थानकात धिंगाना घातला. हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. या अचानक घडलेल्या प्रकाराने मात्र महिलावर्गासह प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.

नेमकं प्रकरण काय?

विटा बसस्थानकात गुरुवारी (15 जुलै) सायंकाळी एक व्यक्ती चक्क आपल्या अंगावर केवळ अंतवस्त्रच परिधान करुन बसस्थानकात आगमन करते. अंगावर कोणतेही कपडे नसलेली हीच व्यक्ती थेट प्रवाशांसाठी असणाऱ्या फलाटावरुन चालत जावून तेथे पहारा देणाऱ्याच्या टेबलवर जावून बसते. ती एवढ्यावरच न थांबता प्रवाशांना हातवारे करत इशारेही करु लागते. या अचानक घडलेल्या प्रकाराने बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना या सर्व प्रकाराने शर्मेने मान खाली घालावी लागली.

सुरक्षा रक्षकाने काठीचा धाक दाखवत बाहेर काढलं

विटा बसस्थानक हे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि प्रशस्त स्थानक आहे. पण इथे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका व्यक्तीने कपडे काढून बसस्थानकात प्रवेश केल्याने येथील प्रवाशांचे धाबे दणाणले. अखेर या कपडे काढलेल्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकाने काठीचा धाक दाखवित बाहेर काढले.

बसस्थानकावर गैरप्रकारच्या घटनांमध्ये वाढ

सध्या कोरोनामुळे बसस्थानकात गर्दी जरी कमी असली तरी विटा बसस्थानकात असेच काहीतरी वेगळे प्रकार घडत आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये कुठं बाहेर पडता येत नसले तरी बसस्थानकात येवून टाईमपास करणारेही इथे वाढले आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्षच झाले आहे. इथे नेमण्यात आलेले पोलीस दिसतच नाहीत. यापूर्वी बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अनेक चोरटे हात मारत होते.

माथेफिरुला जेव्हा सुरक्षा रक्षक हटकतो, व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

मालकाच्या मुलीवर कामगाराचा जीव जडला, मालक चिडला, दुहेरी हत्याकांडाने चाकण हादरलं

आठ हजारांचं लाईटबिल थकलं, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापली, अस्वस्थ झालेल्या तरुणाची आत्महत्या

Published On - 3:27 pm, Sat, 17 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI