मुलांसोबत हसून बोलायची! आई वडिलांना आला राग, 11 वर्षांच्या मुलीसोबत पालकांनीच केलं हडळकृत्य

Meerut Crime News : मुलीला वाईट संगत लागली होती, सांगूनही ती ऐकत नव्हती. मुलांसोबत ती मोबाईलवर बोलत बसायची, म्हणून तिची हत्या केली, असं बबलूने पोलिसांना सांगितलं. एक सप्टेंबर रोजी एका नाल्यात ढकलून देत 11 वर्षांच्या निष्पाप मुलीचा तिच्या आईवडिलांनीच खून केला.

मुलांसोबत हसून बोलायची! आई वडिलांना आला राग, 11 वर्षांच्या मुलीसोबत पालकांनीच केलं हडळकृत्य
हत्या करण्यात आलेली 11 वर्षांची मुलगी चंचलImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 7:41 AM

मेरठमध्ये (Meerut News) आईवडिलांनीच आपल्या 11 वर्षांच्या मुलीच्या हत्येचा कट (Murder Mystery) रचलाय. मुलीची हत्या करण्याचं कारणही काळजाचा थरकाप उडवणारं आहे. आपली मुलगी मुलांसोबत हसून बोलते, याचा राग तिच्या आईवडिलांना आला आणि त्यांनी आपल्याच मुलीला जिवंतपणी नाल्यात फेकून देत तिचा जीव (Parents killed daughter) घेतला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. तूर्तास पोलिसांनी हे हडळकृत्य केलेल्या आईवडिलांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केलीय.

बेपत्त असल्याचा बनाव…

बबलू नावाची व्यक्ती एका भाड्याच्या घरात आपल्या तीन मुलांसोबत पत्नीसह राहत होती. बबलू एका कंपनीत कामाला होता. एक सप्टेंबर रोजी संध्याकाळी तो जेव्हा घरी आला, तेव्हा पत्नीसाठी औषधं घेण्यासाठी तो बाहेर पडला. बबलू आणि त्याच्या पत्नीसोबत येण्यासाठी मुलगी चंचल हट्ट करुन लागली. म्हणून तिलाही बाईकवर बसवून दाम्पत्य पुढे निघाले. त्यानंतर बबलू आणि त्याची पत्नी रुबी यांनी मुलीला बर्गर खरेदी करुन दिला. नंतर मुलीला घरी पाठवून दिल्याचं पोलिसांना सांगितलं. पण यानंतर मुलही बेपत्ता झाली, असा बनाव त्याने रचला.

खोटी कहाणी रचत बबलू पोलीस स्थानकात दाखल झाला आणि मुलगी बेपत्ता असल्याची त्याने तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलीस शोध घेऊ लागले. पोलिसांनी बबलू आणि त्याच्या पत्नीचे जबाब नोंदवल्यानंतर त्यांचा संशय अधिकच बळावला. दोघांच्याही जबाबात तफावत आढळून येत होती. त्यामुळे पोलिसांना हे प्रकरण अधिक गंभीर असल्याचं दिसून आलं.

Video : पाहा लाईव्ह घडामोडी

अखेर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर बबलूने खरं काय ते पोलिसांसमोर सांगितलं. घाबरलेल्या बबलूने आपणच मुलीच्या हत्येचा कट रचल्याचं कबूल केलं. मुलीला वाईट संगत लागली होती, सांगूनही ती ऐकत नव्हती, मुलांसोबत ती मोबाईलवर बोलत बसायची, म्हणून तिची हत्या केली, असं बबलूने पोलिसांना सांगितलं. एक सप्टेंबर रोजी एका नाल्यात ढकलून देत 11 वर्षांच्या निष्पाप मुलीचा तिच्या आईवडिलांनीच खून केला, हे अखेर पोलिसांच्या तपासातून उघडकीस आलं.

मुलीची हत्या करणाऱ्या आईवडिलांना कोर्टासमोरही हजर करण्यात आलंय. या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जातोय. अजूनही पोलिसांकडून मुलीचा मृतदेह शोधण्याचं काम केलं जातंय.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.