Mirchi Baba : भक्त ज्याचा फोटो आस्थेनं मोबाईल वॉलपेपरला लावायचे, त्याच्या फोनमध्ये पॉर्न क्लिप! मिर्ची बाबा निघाला लिंगपिसाट बाबा

Mirchi Baba : महिला भेटायला आल्यानंतर बाबा आपल्या घराचे दरवाजे लगेचच बंद करुन घ्यायचा, अशीही माहिती समोर आली आहे.

Mirchi Baba : भक्त ज्याचा फोटो आस्थेनं मोबाईल वॉलपेपरला लावायचे, त्याच्या फोनमध्ये पॉर्न क्लिप! मिर्ची बाबा निघाला लिंगपिसाट बाबा
मिर्ची बाबाचा काळा कारनामा
Image Credit source: Twitter
सिद्धेश सावंत

|

Aug 13, 2022 | 12:54 PM

मिर्ची बाबाच्या (Mirchi Baba News) काळ्या कृत्यांचा आता पर्दाफाश होऊ लागला आहे. भक्त आस्थेनं ज्या बाबाचे फोटो आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवत होते, त्या मिर्ची बाबाच्या मोबाईल फोनमध्ये (Mobile Phone) चक्क पॉर्न क्लिप आढलून आल्या आहेत. एकएक हादरुन टाकणारे खुलासे मिर्ची बाबाबद्दल होऊ लागले आहेत. अटक झाल्यानंतर ढसाढसा जेलमध्ये मिर्ची बाबा रडला होता. मिर्ची बाबाविरोधात एका महिलेनं बलात्काराचा (Rape Allegations) आरोप केला होता. त्यानंतर या मिर्ची बाबाला ग्वालिअरमधून अटक करण्यात आलेली होती. दरम्यान, आता जेलची हवा खात असलेल्या मिर्ची बाबाच्या काळा कारनामा उघडकीस येऊ लागल्यानंतर भक्त हैराण झालेत. आपण नेमक्या कोणत्या ढोंगी बाबावर विश्वास ठेवून त्याची भक्ती करत होतो, हे कळल्यानंतर भक्तांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. एक दोन नव्हे तर अनेक पॉर्न किल्प मिर्ची बाबाच्या फोनमध्ये आढळून आल्या. काही व्हिडीओही आढळले. तसंच काही महिलांचे फोन नंबरही सेव्ह केलेले आढळून आले. ज्यात या बाबाने त्यांच्या नवऱ्याच्या नावां लिहून पुढे बायको असा उल्लेख करुन सेव्ह केलेले होते. फौजी की बिवी नावाने सेव्ह केलेले पाच नंबर मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.

सीसीटीव्ही होते, पण….

आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबा जिथे आपल्या भक्तांना भेटत होता, तिथे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेले होते. पण विशेष म्हणजे महिला भक्तांची भेट जिथे बाबा घ्यायचा, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला नव्हता. ज्या खोलीत बाबाने महिलांसोबत नको ती घाणेरडी कृत्य केली, त्या खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता, हेही समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे महिलांना एकट्यातच हा मिर्ची बाबा भेटत असे.

ग्राऊंड फ्लोअरवर महिला भक्तांना काही औषधं दिली आणि भस्म दिलं. पहिल्या माळ्यावर असलेल्या खोली जाऊन तू हे औषधं आणि भ्स्म प्राशन कर, असं महिलेला सांगून तिच्यासोबत संतापजनक कृत्य मिर्ची बाबाने केलं, असा सनसनाटी आरोप करण्यात आलाय. महिला खोली एकटी असल्याचा गैरफायदा उचलत बाबा महिलांसोबत गैरकृत्य करायचा, अशी शंका आता घेतली जातेय.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मिर्ची बाबा आपल्या डुप्लेक्स घरात नेहमी संशयास्पद लोकांसोबत असायचा. मोठमोठे लोकं त्याला भेटायला येत असत, असं पोलिसांनी सूत्रांनी म्हटलंय. अनेकदा मुली, महिला एकट्यातच बाबाला भेटायला येत असता. महिला भेटायला आल्यानंतर बाबा आपल्या घराचे दरवाजे लगेचच बंद करुन घ्यायचा, अशीही माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

कशी झाली बाबाला अटक?

एकी 28 वर्षीय महिलेनं मिर्ची बाबावर बलात्काराचा आरोप केला होता. चार वर्ष मूल होत नाही, म्हणून ही महिला बाबाकडे मदत मागण्यासाठी गेली होती. पण बाबाने बेशुद्ध करुन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेनं केलाय. या महिलेनं केलेल्या पोलीस तक्रारीवरुन पोलिसांनी ग्वालिअरमधून मिर्ची बाबाला अटक केली. त्यानंतर आता या बाबाला पोलीस कोठडी सुनावणी आली असून पोलीस सर्व पैलूंची कसून तपास करतेय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें