AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता कळला का माझा हिसका… देवदर्शन करून येताच नवरा बायकोवर गोळ्या झाडल्या, अचानक..

दशरथ केरू गायकवाड असे हल्लेखोराचे नाव असून दांपत्यावर गोळीबार केल्यानंतर तो फरार झाला आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

आता कळला का माझा हिसका… देवदर्शन करून येताच नवरा बायकोवर गोळ्या झाडल्या, अचानक..
सोलापूर क्राईमImage Credit source: social media
| Updated on: Apr 09, 2025 | 11:07 AM
Share

पंढरपूरहून देवदर्शन करून येणाऱ्या पती-पत्नीला एका भयानक घटनेचा सामना करावा लागला आहे. पूर्व वैमनस्यातून एका इसमाने पती-पत्नीवर गोळीबार करत , त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ‘आता कळलं का माझा हिसका, आता जिवंत सोडत नाही’ असे म्हणत हल्लेखोराने पती-पत्नीवर गोळ्या झाडल्या. – मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर गोळीबाराचा हा थरार घडला असून यामध्ये शिवाजी जाधव (65) आणि सुरेखा जाधव (60) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दशरथ केरू गायकवाड असे हल्लेखोराचे नाव असून दांपत्यावर गोळीबार केल्यानंतर तो फरार झाला आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके पाठवण्यात आली आहेत.

कळलं का माझा हिसका, आता जिवंत सोडत नाही..

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जाधव (65) आणि सुरेखा जाधव (60) हे दोघे पंढरपूर येथून देव दर्शन करून परत येत होते. तेव्हाच हल्लेखोर दशरथ गायकवाड हा येवती गावाच्या हद्दीत दबा धरून बसलेला होता. हे दांपत्य नजरेच्या टप्प्यात येताच गायकवाड याने त्या दोघांवरही निशाणा धरून सटासट गोळ्या झाडल्या. पिस्तूलामधून गोळ्या मारून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

चार वर्षांपूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दशरथ गायकवाड याला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर मोठा अपमान झाल्याची भावना आरोपी गायकवाड याच्या मनात होती. चार वर्षे जुन्या वादातून, पूर्व वैमनस्यातून अपमानाचा बदला घेण्यासाठी गायकवाड याने शिवाजी पुंडलिक जाधव, सुरेखा शिवाजी जाधव या पती-पत्नीवर गोळीबार करत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ‘आता कळलं का माझा हिसका, आता जिवंत सोडत नाही’ असे म्हणत त्याने सटासट गोळ्या झाडल्या.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दशरथ गायकवाड याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठीन मोहोळ पोलिसांचे दोन पथक रवाना झालं आहे.

दरम्यान शिवाजी जाधव आणि त्यांच्या पत्नी सुरेखा यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.