पुण्यातील मुळशी पॅटर्नचा रक्तरंजित इतिहास आणि सूडचक्र, तीन मोठ्या भाईंचे मर्डर कसे आणि का झाले?
Mulshi Pattern Gangstars Murders : शरद मोहोळची हत्या टोळीयुद्धातूनच झाली, मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नितीन कानगुडे मोहरे ठरले. मोहोळ टोळीच्या दोन्ही म्होरक्यांना गणेश मारणेने संपवलं. या हत्येचा मास्टरमाईंड तोच आहे ज्याने संदीप मोहोळचा मर्डर केलेला. या टोळीयुद्धाची सरूवात म्हणजेच मुळशी पॅटर्नची सुरूवात का झाली? त्यामागची प्रमुख कारणं काय? जाणून घ्या.

सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे. पुण्यामध्ये भरदिवसा हत्या, हत्येचा प्रयत्न होत असे गुन्हे घडत आहेत. 5 जानेवारी 2024 ला शरद मोहोळ याची घराजवळच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोहोळ याच्या हत्येने परत एकदा पुणेकर हादरले होते. मोहोळ याचा खून हा गँगवारमधूनच झाला हे काही दिवसांनी पोलीस तपासामध्ये समोर आलं. या सगळ्याचं मुळ म्हणजे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका ठरत आहे. मुळशी तालुक्याची ओळख आता गुन्हेगारांचा तालुका अशी झाली आहे. याच तालुक्यामधील टोळी युद्धामुळे पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. शरद मोहोळच्या हत्येागील मुख्य सुत्रधार गणेश मारणे याचं नाव समोर आलं आहे. हाच गणेश मारणे ज्याने याआधी शरद मोहोळ याचा सख्खा चुलत भाऊ आणि मोहोळ टोळीचा म्होरक्या असलेल्या संदीप मोहोळला त्याने संपवल होतं. या टोळीयुद्धाची सुरूवात का झाली आणि या टोळ्या का निर्माण झाल्या? मुळशी पॅटर्नचा रक्तरंजित इतिहास जाणून घ्या. ...