मुंबई विमानतळावर तब्बल 3 हजार 646 आयफोन जप्त! किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 28, 2021 | 9:52 PM

सर्व आयफोन सिंगापूरवरुन मेमरी कार्ड (Memory Card) म्हणून आणण्यात येत होते. डीआरआरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विभागाकडून करण्यात आलेली ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे. हे सर्व फोन सिंगापूरवरुन एअर कार्गो कॉम्प्लेक्स (ACC), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले होते.

मुंबई विमानतळावर तब्बल 3 हजार 646 आयफोन जप्त! किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क
मुंबई विमानतळावर 3 हजार 646 आयफोन्स जप्त
Follow us

मुंबई : मुंबईत विमानतळावर महसूल गुप्तचर संचलनालय (Directorate of Revenue Intelligence) अर्थात डीआरआयने तब्बल 3 हजार 646 आयफोन (iPhones)जप्त केले आहेत. हे सर्व आयफोन सिंगापूरवरुन मेमरी कार्ड (Memory Card) म्हणून आणण्यात येत होते. डीआरआरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विभागाकडून करण्यात आलेली ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे. हे सर्व फोन सिंगापूरवरुन एअर कार्गो कॉम्प्लेक्स (ACC), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले होते.

महत्वाची बाब म्हणजे कागदपत्रांमध्ये या कन्साईन्मेंटमध्ये मेमरी कार्ड असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, ज्यावेळी तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात तब्बल 3 हजार 646 ‘आयफोन 13’ आढळून आल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. इतकंच नाही तर या कन्साईन्मेंटमध्ये आयफोन्ससह अॅपल वॉच आणि 6 गुगल पिक्सेल फोनही सापडले आहेत.

जप्त केलेल्या फोन्सची एकूण किंमत किती?

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या 3 हजार 646 आयफोन्सची बाजारातील किंमत तब्बल 42 कोटी 86 लाख रुपये आहे. तर कागदपत्रानुसार या कन्साईन्मेंटमध्ये असलेल्या वस्तूंची किंमत फक्त 80 लाख सांगण्यात आली होती.

‘आयफोन 13’ ची भारतातील किंमत काय?

आयफोन 13 ची विक्री भारतात सप्टेंबर 2021 पासून सुरु झाली आहे. या फोनची भारतीय बाजारातील किंमत 70 हजार रुपये आहे. तर यातीलच उच्च श्रेणीच्या फोनची किंमत 1 लाख 800 हजार रुपयांपर्यंत आहे. दरम्यान भारतात मोबाईल फोन्सच्या आयातीवर 44 टक्के सीमाशुल्क असल्याची माहिती डीआरआयकडून देण्यात आली आहे. हे सीमा शुल्क टाळण्यासाठीच अशा प्रकारे विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू, महागड्या वस्तू, सोनं आदी लपवून आणण्याचे प्रकार समोर आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावरून 3.7 कोटी डॉलर्स जप्त

ऑपरेशन चेक शर्ट्स अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयाने धडक कारवाई करत विदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना मुंबईत अटक केली. शुक्रवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शारजाला जाणाऱ्या प्रवाशांनांकडून 3.7 कोटी मूल्याचे अमेरिकी डॉलर्स आणि सौदी दिऱ्हाम्स जप्त करण्यात आले.

स्कॅनिंगमध्ये हे चलन सापडणार नाही अशा प्रकारे बॅगेच्या तळाशी लपवण्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेले विदेशी चलन, सीमा शुल्क कायदा, 1962- कलम 110 अन्वये अवैध आसून, त्या दोन प्रवाशांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Omicron Variant : ‘लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील’, मुख्यमंत्र्यांचं आवाहन; प्रशासनाला महत्वाचे आदेश

Video : राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटलांची घणाघाती टीका

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI