AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : मॅट्रीमोनियल साईटवर पाहिल्याचा दावा, मग इनस्टाग्रामवर मैत्री, मग लग्नाच्या बहाण्याने फसवणूक

मॅट्रीमोनियल साईट, सोशल मीडिया अकाऊंटवरुन विवाहेच्छुक तरुणींना जाळ्यात ओढत त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.

Mumbai Crime : मॅट्रीमोनियल साईटवर पाहिल्याचा दावा, मग इनस्टाग्रामवर मैत्री, मग लग्नाच्या बहाण्याने फसवणूक
इन्स्टाग्रामवर वादग्रस्त स्टेटस टाकणाऱ्या दोघांना अटकImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2023 | 10:35 AM
Share

मुंबई / 28 जुलै 2023 : लग्नाच्या बहाण्याने महिलेशी जवळीक साधत तिची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका फायनान्स कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या महिलेला 12.50 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने कांजूमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून, आरोपीचा शोध घेत आहेत. सूर्या पर्वतनानी असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियावर मैत्री करत महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

इन्स्टाग्रामवर महिलेशी मैत्री केली

आरोपीने पीडितेशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला. आपण जीवनसाथी अॅपवर कनेक्ट झालो होतो, परंतु आपले खाते हटवल्यामुळे संवादात व्यत्यय आला, असे सांगत त्याने महिलेशी मैत्री केली. मग दोघांनी आपले मोबाईल नंबर एक्स्चेंड केले. दोघांमध्ये फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल सुरु झाले. हळूहळू आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. मग तिला लग्नाची मागणी घातली.

विश्वास संपादन करत पैसे घेतले

महिला आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच त्याने आपल्याला तात्काळ पैशांची गरज असल्याचे सांगत महिलेकडे पैशांची मागणी केली. काही दिवसात पैसे परत करण्याचे आश्वासन देत महिलेकडे 12.50 लाक घेतले. पैसे मिळताच आरोपीने महिलेसोबत सर्व संपर्क तोडत गायब झाला. बराच प्रयत्न करुनही आरोपीशी संपर्क होत नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. यानंतर महिलेने कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.