Poonam Pandey | कुरबुरी सुरुच, मारहाणीनंतर पूनम पांडे रुग्णालयात, नवऱ्याला अटक

पूनम पांडे हिच्यावर लग्नानंतर अवघ्या दहा दिवसातच पोलिस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली होती. पतीने विनयभंग करुन धमकावल्याची तक्रार पूनमने गोव्यात दिली होती. पोलिसांनी दिग्दर्शक सॅम बॉम्बे याला अटक केली, मात्र त्याची जामिनावर सुटकाही झाली.

Poonam Pandey | कुरबुरी सुरुच, मारहाणीनंतर पूनम पांडे रुग्णालयात, नवऱ्याला अटक
Poonam Pandey, Sam Bombay
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 10:30 AM

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडेचा (Poonam Pandey) पती सॅम बॉम्बे (Sam Bombay) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. खुद्द पत्नी पूनम पांडेच्या तक्रारीवरुनच सॅमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सॅमने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पूनमने पोलिसात केली.

विशेष म्हणजे तक्रार नोंदवल्यानंतर पूनम पांडेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, पूनमचे डोके, डोळे आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. पूनमच्या तक्रारीवरून सॅमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पूनमची गुपचूप लग्नगाठ

बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत 11 सप्टेंबरला पूनमने लगीनगाठ बांधली होती. फारसा गाजावाजा न करता पूनम गुपचूप लग्नाच्या बोहल्यावर चढली. पूनम आणि सॅम या दोघांनी लग्न समारंभातील फोटो आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.

पूनम पांडे हिच्यावर लग्नानंतर अवघ्या दहा दिवसातच पोलिस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली होती. पतीने विनयभंग करुन धमकावल्याची तक्रार पूनमने गोव्यात दिली होती. पोलिसांनी दिग्दर्शक सॅम बॉम्बे याला अटक केली, मात्र त्याची जामिनावर सुटकाही झाली. त्यानंतर दोघांनी आपल्यातील वाद मिटवत पुन्हा घरोबा केला.

कोण आहे सॅम बॉम्बे?

46 वर्षीय सॅम अहमद बॉम्बे हा चित्रपट दिग्दर्शक आहे. तर पूनम पांडेने काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. मॉडेल पूनम पांडे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. बर्‍याचदा हॉट फोटो आणि व्हिडिओंमुळे ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

View this post on Instagram

A post shared by Sam Bombay (@sambombay)

संबंधित बातम्या

Poonam Pandey | मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे ‘या’ दिग्दर्शकासोबत लग्नाच्या बेडीत

मॉडेल पूनम पांडेला अटक, BMW कारही जप्त

टीम इंडिया जिंकल्यास कपडे उतरवेन, असं पुन्हा म्हणू का? पूनम पांडेचा बोल्ड प्रश्न

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.