अमृता फडणवीस यांचे धक्कादायक खुलासे, जयसिंघानी प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत?

फरार बुकी अनिल जयसिंघांनीला मुंबई पोलिसांनी अखेर अटक केलीय. मुलगी अनिक्षाला अटक केल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा जयसिंघानीकडे वळवला होता. तर दुसरीकडे लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारीत अमृता फडणवीसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

अमृता फडणवीस यांचे धक्कादायक खुलासे, जयसिंघानी प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत?
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 11:05 PM

मुंबई : अखेर फरार बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) मुंबई क्राईम ब्रांचच्या हाती लागलाय. गुजरातच्या कलोल इथून अनिल जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्यात. लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप करत अमृता फडणवीसांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला तात्काळ अटक केली. पण अनिल जयसिंघांनी 7 वर्षांपासून फरार होता. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात आलाय. मात्र अनिल जयसिंघानी इतक्या सहजासहजी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

फरार जयसिंघानीला पकडण्यासाठी पोलिसांनी AJ ऑपरेशन राबवलं. मुंबई पोलिसांकडून एकूण 5 पथकं तयार करण्यात आली. अनिल जयसिंघानी वारंवार आपलं लोकेशन बदलत होता. शिर्डी, नाशिक आणि मीरा रोड असा प्रवास करुन तो गुजरातला गेला. मुलगी अनिक्षाला अटक झाली त्यावेळी 16 मार्चला तो मीरा रोडमध्ये होता. गुजरातमध्ये तब्बल 72 तास अनिल जयसिंघांनी चकवा देत होता. अखेर रविवारी रात्री बाराच्या सुमारास गोध्राला जात असताना कलोल इथून नाकाबंदी करुन त्याला अटक केली.

जयसिंघांनीसोबत त्याचा ड्रायव्हर आणि एका व्यक्तीला अटक झालीय. अटक झालेली तिसरी व्यक्ती अनिक्षाचाच प्रियकर असल्याचं कळतंय. अनिल जयसिंघांनीला अटक झाली. पण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलंय. भाजपच्या मोहीत कंबोज यांनी ट्विट करत म्हटलंय की, “उद्धव ठाकरेंचा फ्रंट मॅन बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि एक माजी पोलीस आयुक्त, तुम्ही आता दिवस मोजा. तुमचा लवकरच पर्दाफाश होणार. जो लोग दूसरे के लिए गड्ढा खोदते है, वह खुद एक दिन उसी गड्ढे में गिर जाते है.”

हे सुद्धा वाचा

मोहित कंबोज यांनी ट्विट करताना उद्धव ठाकरेंचा उल्लेख केलाय. जयसिंघांनी प्रकरण उजेडात आलं तेव्हापासून अनिल जयसिंघानीनं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी त्यांना शिवसेनेत कोणी आणलं? असा प्रतिसवाल करत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला. सुषमा अंधारेंनी तर एकनाथ शिंदेंचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंचं अंबरनाथमधलं ऑफिस जयसिंघानीच्या जागेवर असल्याचा आरोप केलाय.

अनिल जयसिंघानीवर 15 गुन्हे दाखल असून तो 7 वर्षांपासून फरार होता. पण वडिलांवर खोटे गुन्हे दाखल झाले असून, त्यांच्यावरील केसेस मागे घेण्यासाठी अनिक्षानं अमृता फडणवीसांना आधी 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर काही व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेंलिंग कसं केलं, हे स्वत: गृहमंत्री फडणवीसांनी सभागृहात सांगितलं. आता या प्रकरणात नवा खुलासा समोर आलाय.

अमृता फडणवीस यांचे धक्कादायक खुलासे

अमृतांनी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2023 ला पुण्यात गायक अरिजित सिंह याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला अमृता फडणवीस मुख्य अतिथी म्हणून गेल्या होत्या. त्या कार्यक्रमात अनिक्षानं अमृता फडणवीसांची भेट घेतली. कार्यक्रमानंतर मुंबईला परतत असताना अमृता फडणवीसांच्या अंगरक्षकानं तळेगाव टोलनाक्याजवळ ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितलं. अमृता फडणवीस माझी भेट घेणार आहेत, अशी खोटी माहिती अनिक्षानं अमृता फडणवीसांच्या अंगरक्षकाला आधीच दिली होती. त्यानंतर अनिक्षा अमृता फडणवीसांच्या गाडीत बसली. अनिक्षानं त्यानंतर अमृता फडणवीसांना बुकींकडून पैसे उकळण्याची ऑफर दिली.

अमृतांच्या तक्रारीनुसार, अनिक्षानं 16 फेब्रुवारी 2023 ला 1 कोटींची ऑफर दिली. 16 फेब्रुवारी 2023 ला रात्री 9.30 वाजता अनिक्षानं अमृता फडणवीसांच्या मोबाईलवर कॉल केला. पहिल्यांदा काही प्राथमिक चर्चा केली. आणि त्यानंतर वडील अनिल जयसिंघानी यांना गुन्ह्यातून वाचवण्यासाठी एक कोटींची लाच देण्याची ऑफर दिली. त्यानंतर अमृता फडणवीसांनी अनिक्षाचा नंबर ब्लॉक केला.

अमृतांनी 1 कोटींची ऑफर धुडकावून लावल्यानंतर, 18 फेब्रुवारी 2023 च्या रात्री 11 वाजून 55 मिनिटांपासून 19 फेब्रुवारी 2023 च्या मध्यरात्री सव्वाबाराच्या दरम्यान अमृता फडणवीसांच्या व्हॉट्सअॅपवर 22 व्हिडीओ क्लिप्स, 3 व्हाईस नोट्स आणि अनेक मेसेज आले. 19 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता पुन्हा 40 मेसेज, काही व्हिडीओ, व्हाईस नोट्स आणि स्क्रिनशॉट्स पाठवण्यात आले. ज्या नंबरवरुन अमृता फडणवीसांना व्हिडीओ क्लिप्स, मेसेज आणि व्हाईस नोट्स पाठवण्यात आले तो नंबर अनिल जयसिंघानीचा होता. आता अनिल जयसिंघानीच पोलिसांच्या तावडीत आलाय. त्यामुळं प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न पोलिसांचा असेल. त्याचबरोबर फडणवीसांनी व्यक्त केलेल्या शंकेनुसार काही गौप्यस्फोट होतात का? हेही कळेल.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.