AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेयसीला भेटायला आला अन् जाळ्यात फसला, दाऊदशी जवळीक असलेल्या कुख्यात ड्रग माफिया सोनू पठाणला बेड्या

दक्षिण मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा पुरवठा करणारा तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जवळिक असलेला कुख्यात ड्रग माफिया सोनू पठाण याला मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

प्रेयसीला भेटायला आला अन् जाळ्यात फसला, दाऊदशी जवळीक असलेल्या कुख्यात ड्रग माफिया सोनू पठाणला बेड्या
SONU PATHAN
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 12:19 AM
Share

मुंबई : दक्षिण मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा पुरवठा करणारा तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जवळीक असलेला कुख्यात ड्रग माफिया सोनू पठाण (Sonu Pathan) याला मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. रविवारी (4 जुलै) ही अटकेची कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या सोनू पठाणवर गंभीर अशा 10 गुन्ह्यांची नोंद असून तो तडीपार होता. रविवारी तो आपल्या एका महिला प्रेयसीला भेटायला आला होता. यावेळी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. (Drug Mafia Sonu Pathan has been arrested by Mumbai NCB)

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सोनू पठाण हा दक्षिण मुंबईपासून बांद्रापर्यंत अनेक ड्रग्ज विक्री करणाऱ्या लोकांना ड्रग्ज पुरवित होता. ड्रग्जचा कारखाना चालविणाऱ्या चिंकू पठाण आणि डोंगरीची ड्रग माफिया क्वीन इकरा कुरेशीच्या ड्रग व्यवसायात सोनू पठाण हा गुरु असल्याचे म्हटले जाते.

तडीपार असला तरी मुंबईत वावरायचा

एवढंच नव्हे तर सोनू पठाण सध्या तड़ीपार होता. तरीदेखील तो मुंबईत वावरत होता. त्याच्या विरोधात ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकड़े तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच मुंबई पोलिसांच्या विविध पोलीस ठाण्यात धमकी, हत्येचा प्रयत्न, ड्रग्स विक्री आणि आयपीसीच्या विविध कलमाखाली एकूण 7 गुन्हे दाखल आहेत .

चिंकू पठाणला पुरवित होता ड्रग !

सोनू पठाण हा ड्रग्जचा मोठा सप्लायर असून थेट डॉन दाऊदच्या संपर्कामध्ये असल्याचे म्हटले जाते. महत्वाची बाब म्हणजे डोंगरी भागात ड्रग्जचा कारखाना चालविणाऱ्या आणि एनसीबीमार्फत काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपी चिंकू पठाण ह्याला सोनू पठाण हा ड्रग्जचा पुरवठा करत होता.

लेडी डॉन ड्रग माफिया क्वीन इकराचा गुरु !

डोंगरीची लेडी डॉन आणि महिलांमार्फ़त मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज रॅकेट चालविणारी ड्रग माफिया म्हणून क्वीन इकरा कुरेशी हिची ओळख आहे. याच ड्रग माफिया क्वीनचा सोनू पठाण हा ड्रग्ज व्यवसायातील गुरु असल्याचे म्हटले जाते. कारण इकरा ही सोनू पठाणकडून ड्रग्ज घेऊन नंतर हाच ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर विकत होती. मात्र काही महिन्यापूर्वी एनसीबीने धडक कारवाई करत इकरलाही अटक केली होती.

इतर बातम्या :

15 फिल्म, 20 मालिकांमध्ये दमदार काम, कॅन्सरनं गाठलं, आर्थिक विवंचना, घरातलं सामान विकण्याची हिरोईनवर वेळ

तब्बल 2 हजार कोटींचे 293 किलो हेरॉईन जप्त, DRI ची मोठी कारवाई, तिघांना अटक

वैयक्तिक कामासाठी हवालदार घरी आला, गळा चिरुन हत्या, शत्रूचा घाट की नक्षली समर्थकांचं कृत्य?

(drug Mafia Sonu Pathan has been arrested by Mumbai NCB)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.