तब्बल 2 हजार कोटींचे 293 किलो हेरॉईन जप्त, DRI ची मोठी कारवाई, तिघांना अटक

महसूल गुप्तचर संचलनालयाने (DRI) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये DRI ने तब्बल 293.81 किलो हेरॉईन जप्त केले आहे.

तब्बल 2 हजार कोटींचे 293 किलो हेरॉईन जप्त, DRI ची मोठी कारवाई, तिघांना अटक

मुंबई : महसूल गुप्तचर संचलनालयाने (DRI) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये DRI ने तब्बल 293.81 किलो हेरॉईन जप्त केले आहे. सध्याच्या बाजारमूल्यानुसार जप्त केलेल्या या हेरॉईनची किंमत तब्बल दोन हजार कोटींच्या घरात आहे. मागील कित्येक वर्षांमधील DRI ची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाशी संबंधित पंजाबमधून एक तर मध्यप्रदेशमधील दोघांना अटक करण्यात आले आहे. (Mumbai DRI seized worth of 2 Crore rupees heroin in Mumbai arrested Three accused)

मिळालेल्या माहितीनुसार पंजाबच्या तरनतारन या भागात असलेल्या एका कंपनीद्वारे इराणहून मुंबईमार्गे हेरॉईनची तस्करी केली जात होती. याची माहिती DRI च्या अधिकाऱ्यांना मिळाली. हे हेरॉईन इराणच्या चाबहार पोर्टवरुन मुंबईमध्ये आणण्यात येणार होते. तसेच मुंबईहून त्याची पंजामध्ये तस्करी केली जााणार होती.

तस्करीप्रकरणी तिघांना अटक

मात्र, DRI च्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी मुंबईमध्ये आलेल्या दोन कंटेनरची तपासणी केली. तपासणीनंतर या कंटनेमध्ये पांढऱ्या रंगाचे पावडर असलेल्या सहा पिशव्या मिळाल्या. या पिशव्यांमधील पांढऱ्या पावडरची चाचणी केली असता ते हेरॉईन असल्याचे समजले. या प्रकारानंतर DRI ने प्रकरणाच्या खोलात जाण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमध्ये तरनतारन येथील संधू एक्सपोर्ट नावाच्या कंपनीचे मालक प्रभजीत सिंह यांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणाशी निगडित आणखी दोघांना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

अशी केली जात होती तस्करी

भारतात मादक पदार्थांमध्ये हेरॉईनची सर्वात जास्त तस्करी होते. त्यानंतर भांग आणि कोकेन यांची तस्करी केली जाते. या सर्व पदार्थांच्या वाहतुकीला सध्या बंदी आहे. मात्र, असे असले तरी या प्रकरणात सिप्सम स्टोन आणि टॅल्कम पावडरच्या नावाखाली हेरॉईनची तस्करी केली जात होती. तसेच DRI च्या अधिकाऱ्यांनी ही तस्करी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा सर्व माल जेएनपीटी बंदारवर उतवला जात होता. सध्या उतरवलेले सर्व हेरॉईन हे पंजाबसाठी रवाना होणार होते. मात्र DRI च्या अधिकाऱ्यांनी हा कट उधळून लावला.

इतर बातम्या :

आधी सोशल मीडियावर ओळख, नंतर वारंवार लैंगिक अत्याचार, वाद झाल्यामुळे अपहरणाचा व्हिडीओ केला व्हायरल, नागपूर हादरलं !

अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात कामाची संधी, आता करतो मोबाईलची चोरी, नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इगतपुरीतील रेव्ह पार्टी प्रकरण, 5 आरोपींना जामीन 20 जणांचा जामीन अर्ज फेटाळला, हीना पांचाळचं काय झालं?

(Mumbai DRI seized worth of 2 Crore rupees heroin in Mumbai arrested Three accused)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI