VIDEO : धक्का लागण्याच्या वादातून टोळक्याकडून दोघांवर प्राणघातक हल्ला, सीसीटीव्हीत थरार कैद, पाहा व्हिडीओ

किरकोळ वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. संबंधित घटना ही सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

VIDEO : धक्का लागण्याच्या वादातून टोळक्याकडून दोघांवर प्राणघातक हल्ला, सीसीटीव्हीत थरार कैद, पाहा व्हिडीओ

कल्याण (ठाणे) : किरकोळ वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. संबंधित घटना ही सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये भर रस्त्यात गावगुंडाकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलीस यंत्रणा या गावगुंडाना आवरण्यात अपयशी ठरताना दिसून येत आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पूर्व भागातील काका ढाबा परिसरात काही तरुणांनी कापड दुकान चालविणाऱ्या संतोष प्रजापती आणि विजय दुबे या दोघांवर प्राणघातक हल्ला केला. त्यांनी हाती धारदार शस्त्र आणि काठी घेऊन हल्ला केला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

रविवारी विजय आणि संतोष हे दोघे दुकान बंद करुन पानाच्या टपरीवर पान खाण्यासाठी गेले होत. त्याच ठिकाणी काही तरुणांशी धक्का लागण्यावरुन या दोघांचा वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणारीत झाले. टोळक्याकडून झालेल्या हल्ल्यात विजय आणि संतोष हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णलायात उपचार सुरु आहेत.

परिसरात दहशतीचं वातावरण

या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत. हल्ला करणाऱ्या तरुणांपैकी काही तरुणांना जखमी तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप सुद्धा होत असला तरी ज्याप्रकारे या दोन व्यापाऱ्यांवर टोळक्याकडून हल्ला झाला तो भयानक आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चक्कीनाका, खडे गोलवली, चिकनी पाडा, काकाचा ढाबा परिसरात गावगुंडाची दहशत खूपच वाढली आहे. काही राजकीय मंडळी या गावगुंडाना चिथावत असले तरी पोलीस कुठे तरी कमी पडत आहेत, हेच दिसतंय.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

पुण्यातही दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात दोन तरुणांवर लोखंडी कोयत्याने वार करणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी पेट्रोल पंपावर या फरार टोळक्याला जेरबंद केलं. पूर्व वैमनस्यातून आरोपींनी दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. लकी अरुण गायकवाड (वय 19), तुषार प्रकाश डोबे (वय 21), तेजस तुकाराम येनपुरे (वय 19), आदित्य जगमोहन सिन्हा (वय 18), सार्थक संगीत मिसाळ (वय 19), शुभम रविंद्र हिरे (वय 21), तुकाराम रामचंद्र येनपुरे (वय 52, सर्व रा. दत्तनगर, जांभुळवाडी रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर यातील एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत त्याची येरवडा येथील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

पुण्यात बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार

दुसरीकडे, पुण्यातील गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये हॉटेल मालकावर कोयत्याने वार केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. दोघे जण बिर्याणी घेण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर मालकाची शाब्दिक आणि किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्या दोघांनी आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्यासारख्या धारदार हत्याराने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. तेव्हा हॉटेल मालकाच्या शेजारी उभा असलेल्या कामगार इसराफिल हा मध्ये आल्याने तो वार त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसून तो गंभीर जखमी झाला.

हेही वाचा :

कोर्ट मॅरेज केलं, कुटुंबापासून लपवलं, दोनच महिन्यात नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून संपवलं

दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीप, एक्स बॉयफ्रेण्डला पुन्हा भेटायला बोलावलं आणि…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI