मुंबई : औरंगाबाद येथील एका महिलेने आपल्या पतीला परस्त्रीसोबत फिरताना रंगेहाथ पकल्यानंतर मारहाण केल्याची घटना ताजी असताना मुंबईत देखील तशीच काहिशी घटना घडली आहे. मुंबईच्या विक्रोळी येथील सर्व्हिस रोडवर दोन तरुणींनी मिळून एका तरुणीला प्रचंड चोप दिल्याचं समोर आलं आहे. संबंधित घटना ही बुधवारी (11 ऑगस्टला) घडली होती. पण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी काही तरुणांनी ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. नंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यानंतर मुलींच्या फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.