AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Deshmukh : सचिन वाझेनी घेतली अनिल देशमुखांची शाळा, उलट तपासणीत काय घडलं; वाचा टू द पॉईंट

मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट सिपी मिलिंद भारंबे यांना साक्षीदार म्हणून बोलावण्याची सचिन वाझे यांची मागणी केली. चांदीवाल आयोगाचे न्यायमूर्ती चांदीवाल यांच्याकडे तसा अर्जही वाझे यांनी सादर केला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Anil Deshmukh : सचिन वाझेनी घेतली अनिल देशमुखांची शाळा, उलट तपासणीत काय घडलं; वाचा टू द पॉईंट
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सचिन वाझेच्या वकिलाकडून चांदिवाल आयोगासमोर उलटतपासणी
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 4:50 PM
Share

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज चांदीवाल आयोगासमोर उलटतपासणी झाली. आज सचिन वाझे यांनी स्वतः अनिल देशमुख यांची उलटतपासणी घेतली. यावेळी अनेक प्रश्न वाझे यांनी देशमुखांना विचारले. तसेच मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट सिपी मिलिंद भारंबे यांना साक्षीदार म्हणून बोलावण्याची सचिन वाझे यांची मागणी केली. चांदीवाल आयोगाचे न्यायमूर्ती चांदीवाल यांच्याकडे तसा अर्जही वाझे यांनी सादर केला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतर कोर्ट मिलिंद भारंबे यांना बोलवायचं की नाही या बाबत निकाल देईल. (In the Chandiwal Commission, Sachin Waze cross-examined former Home Minister Anil Deshmukh)

सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांना विचारलेले प्रश्न जसेच्या तसे

सचिन वाझे : आमदार कधी झाला?

अनिल देशमुख : मी सार्वजनिक जीवनात 1990 सालात आलो. नरखेड पंचायत समिती अध्यक्ष होतो. 1995 सालात अपक्ष निवडून आलो.

सचिन वाझे : मंत्री कधी झालात ?

अनिल देशमुख : 1995 सालात

सचिन वाझे : कोणत्या विभागाचे ?

अनिल देशमुख : शालेय शिक्षण. 2009 मध्ये पुन्हा चौथ्या वेळी निवडून आलो आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री झालो. 2019 मध्ये मी पाचव्यांदा निवडून आलो आणि गृहमंत्री झालो.

सचिन वाझे : आपण पाच वेळा गोपनीयतेची शपथ घेतलीत. प्रत्येक वेळी काही ट्रेनिंग असते का ?

अनिल देशमुख : तशी काही पद्धत नाही. देशात कुठेच पद्धत नाही.

सचिन वाझे : 2019 सालात कधी शपथ घेतलीत ?

अनिल देशमुख : आम्ही डिसेंबर 2019 मध्ये गृहमंत्री म्हणून शपथ घेतली. 5 जानेवारीला 2020 मला गृहमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं.

सचिन वाझे : चार्ज घेतल्यानंतर तुम्हाला कोणी खात्याची माहिती दिली? गृहमंत्र्याचं कर्तव्य कोणी सांगितलं ?

अनिल देशमुख : खात्याचा चार्ज घेतल्यानंतर आपण माहिती घेतो. अभ्यास करतो. गृह मंत्रालयात 3 अतिरिक्त सेक्रेटरी आणि 1 प्रधान सचिव असतात.

सचिन वाझे : खात्याची माहिती घेण्यासाठी किती कालावधी लागतो? किती दिवसात आपण हे सर्व समजून घेतलेत? ग्रहमंत्रालयात किती विभाग आहेत? किती उप विभाग आहेत ?

अनिल देशमुख : ग्रहमंत्रालय खूप मोठं आहे. डीजी ऑफिस वेगळं आहे. एसीबी वेगळं आहे. सीआयडी, होमगार्ड, अनेक विभाग वेगळे आहेत. पोलीस आयुक्तालय आदी भाग आहेत.

सचिन वाझे : संजीव पालांडे यांना नेमणूक करण्यासाठी कोणाला संगितलं होतं का ?

अनिल देशमुख : मला आठवत नाही. रेव्हेन्यू विभागातून मी माहिती घेतली. त्यांच्याबाबत मी चांगलं ऐकलं होतं. त्यानंतर मी पालांडे यांना बोलावलं. मी चार पाच जणांची माहिती घेतली. त्यानंतर पालांडे यांची नियुक्ती केली.

सचिन वाझे : पालांडे हे सिक्रेट कागदपत्रे हाताळत होते का ?

अनिल देशमुख : काही महत्वाची कॉन्फिडन्शिअल माझ्याकडे असायची. काही पालांडे यांच्याकडे असायची.

सचिन वाझे : केडर आणि नॉन केडर यात काय फरक आहे ?

अनिल देशमुख : मला माहित आहे.

सचिन वाझे : तुम्ही पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्डाचे सदस्य होता का?

अनिल देशमुख : मी सदस्य नव्हतो.

सचिन वाझे : तुम्ही पोस्टिंगबाबतच्या समितीचा सदस्य होता का ?

अनिल देशमुख : नाही

सचिन वाझे : परमबीर सिग यांनी पत्र लिहलं. त्यानंतर कमिटी बसली. त्यानंतर 30 मार्च 2021 ला जीआर काढण्यात आला. त्यात दोन जीआर काढण्यात आलेत का ?

अनिल देशमुख : मला आठवत नाही.

सचिन वाझे : तुम्ही या 30 मार्चचा जीआरशी संबंधित आहात का ?

अनिल देशमुख : सिंगच पत्र वाचल्यानंतर त्यात दिसलं. चुकीचं, राजकीय आरोप असल्याचं दिसत आहेत. हे मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं. याबाबत चौकशी करा. त्यांनी चौकशी नेमली.

सचिन वाझे : तुम्ही जीआर काढण्यात सहभागी होता ?

अनिल देशमुख : मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली त्यांनी ती नेमली.

सचिन वाझे : तुम्हाला या जीआरबाबत माहिती कधी आणि कशी मिळाली ?

अनिल देशमुख : जीआरची कॉपी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा मला कळालं.

सचिन वाझे : तुमच्या सचिवाने कॉपी दिली का ?

अनिल देशमुख : मला नक्की कॉपी कोणी दिली आठवत नाही.

सचिन वाझे : स्पेशल आयी आणि आयजीपी यात काही फरक आहे का ?

अनिल देशमुख : याचं उत्तर द्यायची आवश्यकता नाही. मला माहित आहे.

सचिन वाझे : डीजी आणि डीजीपी हे दोन वेगवेगळे आहेत हे खरं आहे का ?

अनिल देशमुख : डीजीपी हा महाराष्ट्र पोलीस प्रमुख असतो आणि डीजी हा एसीबी आदी विभागाचा असतो.

सचिन वाझे : मुंबई पोलीस आयुक्त हे डीजीपीला रिपोर्ट करतात का ?

अनिल देशमुख : पोलीस मॅन्युलप्रमाणे करायला पाहिजे.

सचिन वाझे : जॉईंट सीपीने सीपी आणि इतरांना डीजीपी, एसीएस होम यांना करायला पाहिजे का ?

अनिल देशमुख : जॉईंट सीपी हे सीपी मुंबईला रिपोर्ट करत असतात. त्यांना वाटलं तर ते करू शकतात.

सचिन वाझे : हेमंत नगराळे हे डीजीपी महाराष्ट्र होते नंतर ते सीपी मुंबई झालेत ?

अनिल देशमुख : हो

सचिन वाझे : तुम्हाला कधी कळलं वाझे हे CIU चे प्रमुख झालेत ?

अनिल देशमुख : माझ्याकडे तक्रार आल्यात. सचिन वाझे यांना 14 ते 15 वर्ष सस्पेन्स केलं होतं. अशा अधिकाऱ्यांना पुन्हा खात्यात घेतलं. त्यात गुन्हे शाखेत दिलं. लगेच दुसऱ्या दिवशी त्याला सीआययू दिलं. एखाद्या निलंबित अधिकाऱ्यास परत घेतल्यास त्याला साईट ब्रांचला नियुक्ती केली जाते. त्यांना एक दिवस साईट ब्रांचला घेतलं. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांना क्राईम ब्रांचमध्ये घेण्यात आलं. तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुधाकर देशमुख, विनय घोरपडे यांना डावलून सचिन वाझे यांना नेमण्यात आल्याची तक्रार माझ्याकडे आली. सचिन वाझे याच्या नियुक्तीला तेव्हाचे जॉईंट सीपी संतोष रस्तोगी यांनी आक्षेप घेतला होता.

सचिन वाझे : एपीआयची इंचार्ज म्हणून नियुक्ती होऊ शकत नाही, हे कोणत्या नियमानुसार आहे ?

अनिल देशमुख : नियम असेल म्हणूनच तर तेव्हाच्या जॉईंट सीपीने आक्षेप घेतला होता.

सचिन वाझे : युनिट इंचार्ज एपीआय नेमू नये याबाबत काही सांगू शकता का ?

अनिल देशमुख : जॉईंट सिपी आक्षेप घेतात त्यात काही तरी महत्वाचं आहे. सचिन वाझे यांची 10/6 रोजी नियुक्ती झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी माझ्याकडे तक्रार आली.

सचिन वाझे : कोणी तक्रारी केल्या ? लेखी होत्या की ओरल ?

अनिल देशमुख : अनेक तक्रारी आल्या.

सचिन वाझे : आज्ञा नाईक हिच्या तक्रारीनंतर तुम्ही अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा पुन्हा तपास करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आपण पुन्हा तपास करण्याचे आदेश दिलेत ?

अनिल देशमुख : त्या मला भेटल्या. पण मी काय ऑर्डर पास केली मला आठवत नाही.

सचिन वाझे : अनिल देशमुख@ncp हे ट्विट खात आहे का ?

अनिल देशमुख : आहे

सचिन वाझे : 26 मे 2020 रोजी 8.40 pm वाजता आपण ट्विट केलं आहे. अनव्य नाईक बाबत पोस्ट केली होती.

अनिल देशमुख : मी चेक करून सांगतो.

सचिन वाझे : आपण जे पुन्हा तपासाचे जे आदेश दिले होते. ते आपण सीआयडीला केले होते. त्या विभागाच्या डीजीने ते अमान्य केले होते ?

अनिल देशमुख : मला आठवत नाही

इतर बातम्या

Kalicharan : कालीचरण बाबाला ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Pune crime | पुण्यातील धानोरीत गावगुंडांचा हैदोस ; सर्वसामन्यांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.