भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा पोलीस ठाण्यातच गोळीबार, शीतयुद्धाचा मोठा फुगा फुटला

कल्याण पूर्वेत भाजप आणि शिंदे गट यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या शीत युद्धाचा मोठा फुगा आज थेट पोलीस ठाण्यातच फुटला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडल्या आहेत. आपण आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्याचं गणपत गायकवाड यांचं म्हणणं आहे. या गोळीबारात शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले आहेत.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा पोलीस ठाण्यातच गोळीबार, शीतयुद्धाचा मोठा फुगा फुटला
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 8:02 AM

सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 3 फेब्रुवारी 2024 : कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा राजकीय राडा बघायला मिळतोय. हा राडा इतका भयानक आहे की, ज्याची आपण कधी कल्पना देखील करु शकणार नाही. चक्क पोलीस ठाण्यात गोळीबाराची घडना घडली आहे. विशेष म्हणजे हा गोळीबार गुन्हेगारांकडून नाही तर राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडला आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आता शहरातील पोलीसही सतर्क झाले आहेत. या घटनेत शिंदे गटाचे दोन तरुण नेते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड या घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे. या गोळीबारात महेश गायकवाड यांचे मित्र राहुल पाटील यांनादेखील दोन गोळ्या लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

शीतयुद्धाचा मोठा फुगा पोलीस ठाण्यातच फुटला

गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर असतात. तसं असलं तरी त्यांच्यात सातत्याने राजकीय शीतयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं. याच शीतयुद्धाचा मोठा फुगा आज उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात फुटलेला बघायला मिळाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिललाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली. त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते. यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यावेळी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात पाच ते सहा राउंड फायर करण्यात आल्या आहेत.

जखमी महेश गायकवाड कोण आहेत?

कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड आणि माजी नगरसेवर महेश गायकवाड यांच्यात सातत्याने राजकीय वाद रंगलेला बघायला मिळतो. महेश गायकवाड हे शिंदे गटाचे तरुण नेते आहेत. ते शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख आहेत. ते कल्याण पूर्वेत अतिशय सक्रिय आहेत. त्यांच्याकडून कल्याण पूर्वेत सातत्याने विविध सामाजिक कामे केली जात आहेत. लॉकडाऊनच्या काळापासून महेश गायकवाड यांची शहरात लोकप्रियता चांगली वाढली. त्यांच्याकडून अनेकांना मदत झाली. त्यांच्या समाजकार्यामुळे तरुणांमध्ये त्यांची क्रेझ आहे. असं असलं तरी महेश गायकवाड यांचा कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत सातत्याने कोणत्या न कोणत्या कारणाने राजकीय वाद रंगताना बघायला मिळत असतो. काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेत महेश गायकवाड यांचे भावी आमदार म्हणनूही बॅनर लागले होते. विशेष म्हणजे नुकतंच काही दिवसांपूर्वी महेश गायकवाड यांचा गट आणि आमदार गणपत गायकवाड यांचा गट कोळसेवाडी पोलीस ठाण्यातच समोरासमोर आला होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीमुळे वाद मिटला होता. पण आज या घटनेने अक्षरश: टोक गाठलं आहे.

गणपत गायकवाड कोण आहेत?

गणपत गायकवाड यांचंदेखील कल्याण पूर्वेत चांगलं नाव आहे. गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेत सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा कल्याणमध्ये आधी केबलचा व्यवसाय होता. एकेकाळी गणपत गायकवाड कल्याण शहरात रिक्षा चालवायचे. पण गणपत गायकवाड यांनी कामासोबत जनसंपर्क वाढवला, जनसेवा केली. त्यामुळे त्यांची राजकीय क्षेत्रात प्रगती होत गेली. गणपत गायकवाड यांनी जेव्हा पहिल्यांदा आमदारकीसाठी उमेदवारी लढवली तेव्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. ते सध्या भाजपमध्ये आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ते मानले जातात. गणपत गायकवाड यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांचं कल्याणमध्ये विविध समाजाचे नागरीक, सामाजिक संघटना यांच्यासोबत खूप चांगलं नातं आहे. ते आपल्याकडे मदतीसाठी येणाऱ्या नागरिकांना मदत करत असतात. याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतात.

राहुल पाटील यांच्यावर याआधीदेखील दुसऱ्या प्रकरणात झालाय गोळीबार

राहुल पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे. बैलगाडा शर्यतीमुळे हे नाव राज्यभरात पोहोचलं आहे. राहुल पाटील यांचा मथुर बैल हा अतिशय प्रसिद्ध बैल आहे. याच बैलाला विकत घेण्याच्या मुद्द्यावरुन राहुल पाटील यांच्यावर एकदा गोळीबार देखील झाल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी ते सुखरुप बचावले होते. पण त्यानंतर आता महेश गायकवाड यांच्यासोबत असताना पोलीस ठाण्यातच त्यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

‘मी स्वत: गोळी झाडली, मला पश्चात्ताप नाही’,  आमदारांची प्रतिक्रिया

दरम्यान, गणपत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपण गोळी झाडल्याचं कबूल केलं आहे. “पोलीस ठाण्याच्या दरवाज्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेवर या लोकांनी जबरदस्ती कब्जा केला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्या सारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे. मी स्वत: गोळी झाडली. मला काही पश्चात्ताप नाही. कारण माझ्या मुलांना पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर मारत असतील तर मग मी काय करणार?”, अशी पहिली प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली.

“मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण माझं आत्मसंरक्षण करण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळून ठेवले आहेत. त्यांनी दुसऱ्याचं आयुष्य खराब करायला घेतलेलं आहे”, असं गणपत गायकवाड म्हणाले.

“मी दहा वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती. त्या जागामालकांना आम्ही दोन-तीन वेळा पैसे दिले. पण नंतर ते सह्या करण्यासाठी येत नव्हते. नंतर आम्ही कोर्टात गेलो. आम्ही कोर्टात केस जिंकलो. केस जिंकल्यानंतर सात-बारा आमच्या कंपनीच्या नावावर झाला त्यावेळी महेश गायकवाड यांनी जबरदस्ती येऊन आमच्या जागेवर कब्जा केला. मी परवा येऊन त्यांना विनंती केली होती की, तुम्ही जबरदस्ती जागेवर कब्जा करु नका. तुम्ही कोर्टात जा. कोर्टातून ऑर्डर आणा. कोर्टातून ऑर्डर आणली तर लगेच आम्ही ही जागा तुम्हाला देवून टाकू. तुम्ही कोर्टात जा, पण दादागिरी करु नका. त्यांनी त्या दिवशी सुद्धा दादागिरी केली आणि आज सुद्धा दादागिरी केली. पोलीस ठाणे परिसरात तो जवळजवळ 400 लोकं घेऊन आला होता. माझा मुलगा पोलीस ठाण्यातून बाहेर जात होता. त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. ते मला सहन झालं नाही”, अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली आहे.

गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ बघा

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.