पुरामुळे मुंबईत दूधाची आवक घटली, भेसळखोरांचे फावले, मालाड-गोवंडीत धडक कारवाई

महाराष्ट्रातील पुराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कमी येणाऱ्या दूध साठ्यामुळे भेसळीची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन सज्ज झाले आहे. भेसळ करणाऱ्यांवर करडी नजर आहे, असं अन्न आणि औषध प्रशासन सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितलं.

पुरामुळे मुंबईत दूधाची आवक घटली, भेसळखोरांचे फावले, मालाड-गोवंडीत धडक कारवाई
मुंबईत दूध भेसळखोरी
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 8:43 AM

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईला दूध पुरवठा कमी होत आहे. याचाच गैरफायदा काही समाजकंटक घेताना दिसत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबई पोलिसांच्या मदतीने मुंबईच्या मालाड आणि गोवंडी परिसरात धाड टाकून दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

दुधाच्या टँकरमध्ये पाणी मिसळून वितरण

दुधाची भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत मालाड आणि गोवंडी भागात कारवाई केली आहे. मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून एकाला अटक झाली आहे. 88 लिटरपेक्षा जास्त दूध जप्त करण्यात आले आहे. तर गोवंडी येथील दूध डेअरीचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. या डेअरीत दुधाच्या टँकरमध्ये पाणी मिसळून ते मुंबईत वितरण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत नमुने घेतले आहेत.

दोन महिन्यात 16 जणांवर धाडी

महाराष्ट्रातील पुराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कमी येणाऱ्या दूध साठ्यामुळे भेसळीची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन सज्ज झाले आहे. भेसळ करणाऱ्यांवर करडी नजर आहे, असं अन्न आणि औषध प्रशासन सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितलं. ब्रॅण्डेड दुधाच्या पिशव्यांमधून दूध काढून पाण्याची भेसळ करणाऱ्या 16 जणांवर मागील दोन महिन्यात धाडी पडल्या आहेत. एकूण 39 नमुने घेत 2 हजीर 318 लिटर भेसळयुक्त दुध नष्ट करण्यात आले. 1 लाख 18 हजार 898 रुपयांचे भेसळयुक्त दूध होते.

जकात नाका विशेष मोहीम

मुंबईतील जकात नाक्यावर 170 वाहने तपासली. त्यातून 253 नमुने तपासले असून त्यापैकी 7 कमी दर्जाचे आढळले. त्यानुसार एकूण 1 लाख 71 हजार 600 रुपयांचे 3 हजार 632 लिटर दूध परत पाठवले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पिशवीतील दूध घेताय, सावधान! अमूल दुधात भेसळ करणाऱ्या टोळीला अटक

VIDEO | नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या फोडून अस्वच्छ पाणी, दूध भेसळ करणारी टोळी मुंबईत जेरबंद

(Maharashtra Crime News Milk adulteration gang busted in Mumbai Malad Govandi)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.