VIDEO | ड्रग्ज लपवण्यासाठी मुनमुन धामेचाकडून सॅनिटरी पॅड्सचा वापर, NCB चा दावा

मुनमुन धामेचा क्रुझवर ज्या खोलीत होती, तिथल्या झडतीचा एक व्हिडीओ एनसीबीने जारी केला आहे. तिथे सॅनिटरी पॅड्समध्ये ड्रग्ज लपवल्याचं आढळून आलं आहे, असा दावा एनसीबीकडून करण्यात आला आहे.

VIDEO | ड्रग्ज लपवण्यासाठी मुनमुन धामेचाकडून सॅनिटरी पॅड्सचा वापर, NCB चा दावा
मुनमुन धामेचाने सॅनिटरी पॅड्समध्ये ड्रग्ज लपवल्याचा दावा


मुंबई : मुंबईजवळ समुद्रात क्रुझवर छापा टाकत ड्रग्ज पार्टी उधळल्यानंतर सुरु असलेल्या एनसीबीच्या तपासात नवी माहिती समोर येत आहे. पार्टी प्रकरणी ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांनी ड्रग्ज नेमके कुठे लपवले होते, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मुनमुन धामेचा हिने ड्रग्ज लपवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला, असा एनसीबीचा दावा आहे.

काय आहे प्रकरण?

मुनमुन धामेचा क्रुझवर ज्या खोलीत होती, तिथल्या झडतीचा एक व्हिडीओ एनसीबीने जारी केला आहे. तिथे सॅनिटरी पॅड्समध्ये ड्रग्ज लपवल्याचं आढळून आलं आहे, असा दावा एनसीबीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्या तरुणींना अटक करण्यात आली आहे, त्यांनीही ड्रग्ज लपवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला होता, तर तरुणांनी शूजमध्ये ड्रग्ज लपवले होते, असाही एनसीबीचा दावा आहे.

पाहा व्हिडीओ :

मुंबई ड्रग्ज केस प्रकरणात बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्ज किल्ला कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळून लावला. दोन दिवसांपूर्वी आर्यन खानच्या जामीन अर्जावर कोर्टात प्रचंड युक्तिवाद रंगला. पण अखेर कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. पण किला कोर्टात जामीन अर्ज दाखल करता येऊ शकत नाही, या मुद्द्यावर बोट ठेवून कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

आर्यनच्या वकिलांचा युक्तिवाद

किल्ला कोर्टात शुक्रवारी तब्बल पाच तास सुनावणी चालली. मात्र, एनसीबीच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर या कोर्टात जामिनासाठी अर्ज करणं योग्य नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. आर्यन खानसाठी सतीश माने-शिंदे यांनी केलेल्या युक्तीवादात आर्यनकडे कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळालं नाही, व्हॉट्सअप चॅट त्याला पोलीस कोठडी सुनावण्यासाठी पुरेसं नाही म्हणूनच त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच आर्यन खान भारताबाहेर जाणार नाही. तपासाला पूर्ण सहकार्य करेल, असं म्हटलं. मात्र, कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

आर्यन खानसह 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी

दरम्यान, आर्यन खानसह इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात झालेल्या युक्तिवादावेळी वकील माने-शिंदे यांनी आर्यन खान यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज नाही. आर्यनला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी न्यायालयाला विनंती केली होती. या सुनावणीदरम्यान एनसीबीचे वकील तसेच आर्यन खान आणि इतर आरोपीची बाजू मांडणारे वकील यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली होती. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

इतर बातम्या :

Aryan Khan drug case | आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला, तब्बल अडीच तास युक्तिवाद, दिलासा नाहीच !

शाहरुखच्या पोराचा जामीन अर्ज फेटाळला, आता 14 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागणार? पर्याय काय आहेत?

‘माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार’, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना नोटीस

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI