दादरच्या बिल्डरचे अपहरण-खंडणी प्रकरण, अश्विन नाईकसह सात साथीदारांची निर्दोष मुक्तता

डिसेंबर 2015 मध्ये अश्विन नाईक आणि त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि खंडणीच्या खटल्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईकने त्याच्या सात साथीदारांसोबत मुंबईच्या दादर भागातील एका बिल्डरचे अपहरण केल्याचा आरोप होता.

दादरच्या बिल्डरचे अपहरण-खंडणी प्रकरण, अश्विन नाईकसह सात साथीदारांची निर्दोष मुक्तता
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 7:40 AM

मुंबई : मयत गुंड अमर नाईकच्या भावाची अपहरण आणि खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अश्विन नाईक आणि त्याच्या सात साथीदारांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात मंगळवारी निकाल दिला.

डिसेंबर 2015 मध्ये अश्विन नाईक आणि त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि खंडणीच्या खटल्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईकने त्याच्या सात साथीदारांसोबत मुंबईच्या दादर भागातील एका बिल्डरचे अपहरण केल्याचा आरोप होता. 50 लाख रुपयांची खंडणी आणि 6 हजार चौरस फूटाचा फ्लॅट मागितल्याचा त्याच्यावर आरोप झाला होता.

मुंबई सत्र न्यायालयाने नाईकसह सातजणांची निर्दोष मुक्तता केली. अश्विन नाईकसोबत प्रमोद केळुस्कर, प्रथमेश परब, जनार्दन सकपाळ, राजेश तांबे, अविनाश खेडेकर, मिलिंद परब आणि सूरज गोवर्धन अशी दोषमुक्त झालेल्या इतर आरोपींची नावं आहेत.

नाशकात पोलिसाकडून अपहरण

दरम्यान, पोलिसानेच अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फूस लावून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या पोलिसाला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे.

कुटुंबीयांशी ओळखीचा पोलिसाकडून गैरफायदा

संशयित पोलीस दीपक जठार हा नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. संशयिताच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. संशयिताने पीडित मुलीच्या घरच्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत अपहरण केल्याचा आरोप आहे. फूस लावून त्याने तिला पळवून नेल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईत अल्पवयीन मुलीचं अपहरण

दुसरीकडे, बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याची भेट करुन देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी मुंबईत समोर आला होता. या प्रकरणी 43 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं होतं. दादर जीआरपीने मोठ्या शिताफीने पीडितेला आरोपीच्या तावडीतून सुखरुप सोडवलं होतं. आरोपीचं नाव सुभान शेख होतं, त्याने फेसबुकवर पीडित तरुणीसोबत ओळख निर्माण केली होती.

आरोपीने फेसबुक अकाऊंटवर 20 वर्षीय तरुणाचे फोटो लावले होते. त्याचबरोबर त्याने आपल्या प्रोफाईलमध्ये मोठमोठ्या कलाकारांसोबतचे फोटोही शेअर केले होते. आरोपीने स्वत:ला इव्हेंट मॅनेजर असल्याचे सांगितले होते. त्याने मुलीला शाहरुख खानला भेटणार का? असं विचारलं असता मुलीने होकार दिला होता.

स्वतःला विशीतील तरुण भासवणाऱ्या 43 वर्षीय आरोपीने मुलीला फेसबुकवर मेसेज केला होता की, कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तो आपल्या वडिलांना रेल्वे स्टेशनवर तिला घेण्यासाठी पाठवत आहे. मात्र ओळख लपवणारा आरोपी स्वतःच तिला घेण्यासाठी दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचला. आरोपीने मुलीला भेटल्यानंतर तिच्या मोबाईलचं सीमकार्ड तोडलं. पण रेल्वे पोलिसांनी आरोपीला बरोबर हेरलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला त्याच्या तावडीतून सुखरुप सोडवलं आणि आरोपीला अटक केली.

नागपुरात आंघोळीचा व्हिडीओ शूट करत तरुणीचे अपहरण

दरम्यान, तरुणी आंघोळ करत असतानाचा व्हिडीओ चित्रित करुन आधी तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली, त्यानंतर तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा तरुणीच्या नाते संबंधातील असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

शाहरुख खानसोबत भेट घडवून देण्याचा बहाणा, दादर स्थानकावर अल्पवयीन मुलीचं अपहरण, पोलिसांनी कसं सोडवलं ?

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे, इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला अटक

Non Stop LIVE Update
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.