CCTV | Vasai मध्ये बाईकस्वाराला अडवून नशेखोरांची दादागिरी; बेदम मारहाण, दुचाकीही फोडली

CCTV | Vasai मध्ये बाईकस्वाराला अडवून नशेखोरांची दादागिरी; बेदम मारहाण, दुचाकीही फोडली
वसईत मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
Image Credit source: टीव्ही9

वसईतील चुळणा रोड गोकुळ नगरी फेज दोन परिसरात शनिवारी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास बाईकस्वार तरुणाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.

विजय गायकवाड

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 27, 2022 | 7:57 AM

वसई : मुंबईजवळच्या वसई शहरात (Vasai Crime) नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. वसईतील चुळणा परिसरात बाईकस्वार तरुणाला अडवून 6 ते 7 जणांनी लाथाबुक्क्या आणि दगडाने बेदम मारहाण (Youth beaten up) केल्याचा आरोप आहे. शनिवारी (काल) रात्री 7 ते 8 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीस्वार तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याची बाईकही पूर्णपणे तोडून टाकण्यात आली आहे.

वसईतील चुळणा रोड गोकुळ नगरी फेज दोन परिसरात शनिवारी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.

नेमकं काय घडलं?

टवाळखोरांनी दारुच्या नशेत आधी बाईकस्वार तरुणाला अडवलं. आधी त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्याने दगड, विटा, मार्बलच्या तुकड्यांनी त्याला बेदम मारहाण केली गेली. त्याची युनिकॉन मोटरसायकल देखील दगड मारुन फोडण्यात आली.

मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

गुंडांच्या दहशतीचा आणि मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्हीमधील मारहाणीच्या दृश्यावरून गुंडांची कशी दहशत आहे हे पाहायला मिळत आहे.

तरुणाला गंभीर दुखापत

शशांक शेंदरकर (वय 32 वर्ष) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गुंडांच्या मारहाणीत त्याच्या डोक्याला, पायाला, कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे.

नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण

चुळणा परिसरात चरस, गांजा, ड्रग्ज पिऊन नशेखोर गुंड गर्दी करतात. रस्त्यावर थांबून वाहन चालक किंवा रस्त्याने जाणाऱ्या एकट्या-दुकट्या नागरिकांना अडवतात. त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात. पैसे नाही दिले, तर त्यांना मारहाण करतात. त्यामुळे स्थानिक नागरिक, महिला यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Nalasopara | ‘ये XXX रोता क्यू है’, नालासोपाऱ्यात पादचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण, दोन माथेफिरु पसार

वारंवार हॉर्न वाजवणाऱ्या महिलेला मधलं बोट दाखवलं, पुण्यात इंजिनिअरला बेदम मारहाण

CCTV | डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनविना औषध देण्यास नकार, नशेखोरांनी केमिस्टचे दुकान फोडले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें