VIDEO | दौंडच्या DYSP कडून छेडछाड, पुण्याच्या वकील महिलेचा मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

पुणे जिल्ह्यातील दौंड येथील वकील महिलेने मुंबईतील मंत्रालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोंडचे डीव्हायएसपी (Deputy Superintendent of Police -पोलीस उपअधीक्षक) यांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा दावा महिलेने केला आहे.

VIDEO | दौंडच्या DYSP कडून छेडछाड, पुण्याच्या वकील महिलेचा मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न
मंत्रालयाबाहेर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयाच्या बाहेर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने मुंबईत येऊन मंत्रालय परिसरात तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. तक्रार करणारी महिला पेशाने वकील आहे. आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण

पुणे जिल्ह्यातील दौंड येथील वकील महिलेने मुंबईतील मंत्रालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोंडचे डीव्हायएसपी (Deputy Superintendent of Police -पोलीस उपअधीक्षक) यांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा दावा महिलेने केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई न केल्याचा दावा

पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार करुनही कारवाई केली जात नव्हती. पोलिसांकडून महिलेवरच गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाद मागण्यासाठी वकील महिला वारंवार वरिष्ठ पोलिसांची भेट घेत होती, तरीही न्याय मिळत नसल्याचा आरोप करत तिने टोकाचं पाऊल उचललं.

महिला मरिन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायक म्हणजे महिलेने तिसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. सबंधित महिला मरिन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणी पुढे काय कारवाई होणार, याकडे लक्ष आहे.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

एकतर्फी प्रेमातून बलात्कार, तरुणीसह कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या, आरोपीला अटक

व्हिस्की खरेदीच्या नादात दादरमधील 74 वर्षीय अभिनेत्रीची फसवणूक, 3 लाखांचा ऑनलाईन गंडा

बेटा आय मिस यू, व्हॉट्सअपवर स्टेटस, सासरच्या जाचाला कंटाळून जावयांची आत्महत्या

Published On - 12:58 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI