चायनिजच्या गाडीवर गल्ल्यावरुन राडा, पाच जणांची बेदम मारहाण, भिवंडीत तरुणाचा मृत्यू

वंजारपट्टी म्हाडा कॉलनी येथील मेट्रो हॉटेल परिसरातील एका चायनीज गाडीवर हा प्रकार घडला. पैशांचा गल्ला शफीक शेख घेऊन जात असल्याने चायनिज गाडीवरील अफजल सिद्दीकी, अफसर सिद्दीकी, बशीर अन्सारी, नूर मोहम्मद सिद्दीकी आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशा पाच जणांनी त्याला बेदम मारहाण केली

चायनिजच्या गाडीवर गल्ल्यावरुन राडा, पाच जणांची बेदम मारहाण, भिवंडीत तरुणाचा मृत्यू
भिवंडीत चायनिजच्या गाडीवर राडा
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 12:22 PM

भिवंडी : भिवंडीतील म्हाडा कॉलनी परिसरात चायनिजच्या गाडीवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये रात्री उशिरा राडा झाला. यामध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. मात्र उपचार होण्यापूर्वीच त्याला प्राण गमवावे लागले. तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

शफिक मोहम्मद शेख असं चायनिजच्या गाडीवर झालेल्या राड्यात मृत्युमुखी पडलेल्या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो म्हाडा कॉलनीतील भाजी मार्केट महाड कॉलनी परिसरात राहत होता.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वंजारपट्टी म्हाडा कॉलनी येथील मेट्रो हॉटेल परिसरातील एका चायनीज गाडीवर हा प्रकार घडला. पैशांचा गल्ला शफीक शेख घेऊन जात असल्याने चायनिज गाडीवरील अफजल सिद्दीकी, अफसर सिद्दीकी, बशीर अन्सारी, नूर मोहम्मद सिद्दीकी आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशा पाच जणांनी त्याला अडवले.

छाती आणि पोटावर बेदम मारहाण

शफीकला लाथा बुक्क्यांनी तोंड, छाती आणि पोटावर बेदम मारहाण केल्याने तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक निजामपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

निर्जन स्थळी चाकूच्या धाकाने प्रेमी युगुलांची लूट, CCTV मुळे अखेर दोन गुंड जाळ्यात

पिंपरी चिंचवडमध्ये बाल गुन्हेगारीत प्रचंड वाढ, 110 गंभीर गुन्ह्यात तब्बल 135 अल्पवयीन मुलं

पत्नी छातीवर बसली, प्रियकराने गळा दाबला, रात्रभर पतीच्या मृतदेहासोबत झोपली, अंगावर काटा आणणारा हत्येचा घटनाक्रम

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.