Road Rage Video | कारला कट बसल्याचा राग, वसईत बॅटने स्कॉर्पिओची काच फोडत चालकाला मारहाण

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसईच्या सतीवली खिंड येथे 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हर्षद पांचाळ असे मारहाण झालेल्या कार चालकाचे नाव आहे

Road Rage Video | कारला कट बसल्याचा राग, वसईत बॅटने स्कॉर्पिओची काच फोडत चालकाला मारहाण
वसईत कार चालकावर जीवघेणा हल्ला

वसई : कारला कट बसल्याने तिघा जणांनी भर रस्त्यात स्कॉर्पिओ अडवून चालकाला बेदम मारहाण (Road Rage) केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भर पावसात तीन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ पीडित कार चालकाने ट्विटरवर शेअर केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसईच्या सतीवली खिंड येथे 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हर्षद पांचाळ असे मारहाण झालेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अनोळखी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

अहमदाबाद लेनवर हर्षद पांचाळ आपल्या महिंद्रा स्कार्पिओ कारने अहमदाबादच्या दिशेने जात होते. पाऊस सुरु असल्याने त्यांच्या कारचा एका अर्टिगा कारला कट बसला. हाच राग मनात धरुन अर्टिगामधील तिघा जणांनी पांचाळ यांच्या कारचा पाठलाग केला. त्यानंतर कार आडवी लावून आधी हर्षद पांचाळ यांना शिवीगाळ केली. धक्कादायक म्हणजे एकाने उतरुन बेसबॉल बॅटने पांचाळ यांच्या स्कार्पिओ गाडीची समोरील बाजूची काच फोडली. त्यानंतर लाथा बुक्क्याने मारहाण करुन आरोपी फरार झाले आहेत.

पांचाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे दाद

हर्षद पांचाळ यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला होता. ट्विटरवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री कार्यालय, पंतप्रधान कार्यालय, महाराष्ट्र डीजीपी, पालघर पोलीस, नवी मुंबई पोलीस, सदानंद दाते, नरेश म्हस्के यांच्याकडे मदत मागितली आहे. त्यांनी शस्त्राने माझ्यावर हल्ला केला आणि जीव घेण्याइतपत मारहाण केली, असा आरोप पांचाळ यांनी केला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO : फुकटात फरसाण न दिल्यानं पोलीस अधिकाऱ्याकडून विक्रेत्याला मारहाणीचा आरोप, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

(Mumbai Ahmedabad Highway Vasai Road Rage Ertiga Car Passenger hits Scorpio Car Driver with baseball bat)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI