AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Train Firing Update : भांडणाच्या रागातून कॉन्स्टेबलकडून एएसआयवर गोळीबार, जाब विचारणाऱ्या प्रवाशांनाही सोडले नाही !

जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबल आणि ASI च्या वादात तीन निष्पाप प्रवाशांचाही बळी गेला आहे.

Mumbai Train Firing Update : भांडणाच्या रागातून कॉन्स्टेबलकडून एएसआयवर गोळीबार, जाब विचारणाऱ्या प्रवाशांनाही सोडले नाही !
आपसातील वादातून कॉन्स्टेबलकडून एएसआयवर गोळीबारImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 31, 2023 | 9:58 AM
Share

मुंबई / 31 जुलै 2023 : जयपूरहून मुंबईकडे येत असलेल्या जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये आज पहाटे 5.23 वाजता पालघर स्थानकादरम्यान गोळीबाराची घटना घडली. या घटनेत आरपीएफच्या ASIसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केला. एस्कॉर्ट ड्युटीवर असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन आणि ASI टीकाराम यांच्या काही कारणातून वाद झाला. हा विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात कॉन्स्टेबलने स्वतःकडील सर्व्हिस रायफलने ASI टीकाराम यांच्यावर गोळीबार केला. यावेळी प्रवाशांनी आरडाओरडा करत त्याला जाब विचारण्यास सुरवात केल्याने चेतने तीन प्रवाशांवरही गोळीबार केला. यानंतर आरोपीने चैन ओढून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जीआरपी पोलिसांनी त्याला पकडले.

आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

बोरीवली लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यानंतर आजच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरपीएफच्या माहितीनुसार, रेल्वे प्रवासादरम्यान काही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या जवानांना तैनात केले जाते.

एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात जवानांमध्ये वादातून गोळीबार

आरोपी चेतन आणि मयत ASI दोघेही पॅसेंजरमधील बी-5 या एसी बोगीत एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होते. सूरत-मुंबई अशी दोघांची ड्युटी होती. दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला. या वादातून चेतने ASI टीकारामवर गोळी झाडली. ASI वर गोळी झाडल्याने तेथील प्रवाशांनी आरडाओरजा करण्यास सुरवात केली. प्रवाशांनी कॉन्स्टेबलला जाब विचारायला सुरवात करताच आरोपीने त्यांच्यावरही गोळीबार केला.

आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न फसला

यानंतर पॅसेंजर मीरा-रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान येताच आरोपीने चैन खेचून ट्रेनमधून उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जीआरपीने त्याला पकडले. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. यावेळी क्रॉस फायरिंग झाली का याबाबतही चौकशी सुरु आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच