Jaipur express firing update : जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये पहाटे 3 ते 5 दरम्यान काय घडलं?, साक्षीदाराने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये काल पहाटे गोळीबाराची धक्कदायक घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीच्या सहकाऱ्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.

Jaipur express firing update : जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये पहाटे 3 ते 5 दरम्यान काय घडलं?, साक्षीदाराने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
सक्षीदाराने सांगितला थरारक घटनेपूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 11:40 AM

मुंबई / 1 ऑगस्ट 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला आहे. यात आरपीएफचे एएसआय टीकाराम मीणी यांचाही समावेश आहे. याप्रकरणी आरोपी कॉन्स्टेबल चेतन सिंहला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरु आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पहाटे 3 ते 5 दरम्यान एक्सप्रेसमध्ये काय घडलं याचा घटनाक्रम सांगितला. मात्र शेवटच्या 25 मिनिटांत काय घडलं याबाबत रहस्य कायम आहे. आरोपीची विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करत त्याला बोरीवली जीआरपी स्थानकात आणण्यात आले. आज दुपारी 2 वाजता आरोपीला बोरीवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

चौघांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर चारही मृतदेह जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर एएसआय मीणा आणि एक प्रवासी कादर पुनावाला यांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. तर असगर याच्या नातेवाईकांनी आर्थिक मदत मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने त्याचा आणि चौथा ओळख न पटलेला मृतदेह भगवती रुग्णालयात शवागृहात ठेवण्यात आले आहेत.

संपूर्ण घटनाक्रम जाणून घ्या

नेहमीप्रमाणे 30 जुलै 2023 रोजी एक आरपीएफ एएसआय आणि तीन कॉन्स्टेबल रात्री 9.25 वाजता मुंबई सेंट्रल येथून सौराष्ट्र मेलमध्ये तैनात झाले. साक्षीदाराकडे ARM रायफल 20 राऊन्डसह, कॉन्स्टेबल चेतन सिंह याच्याकडे ARM रायफस 20 राऊन्डसह, ASI टिकाराम मीणा यांच्याकडे एक पिस्टल 10 राऊन्डसह आणि हेडकॉन्स्टेबल नरेंद्र परमार यांच्याकडे एक पिस्टल 10 राऊन्डसह असा शस्त्रसाठा देण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

सूरत येथे सदर ट्रेन रात्री 01:11 वाजता पोहचली. तेथून जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसने रात्री 02:53 वाजता चौघांनी मुंबईकडे प्रवास सुरु केला. ASI टिकाराम मीणा आणि पोलीस शिपाई चेतन सिंह एसी डब्यात तैनात होते. तर साक्षीदार आणि हेड कॉस्टेबल नरेंद्र परमार यांची नेमणूक स्लिपर कोचमध्ये होती.

गाडी मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने साक्षीदार आपल्या कामाचा रिपोर्ट देण्यासाठी ASI टिकाराम मीणा यांना पॅन्ट्री कोचच्या पुढे असणाऱ्या बी-2 नंबरच्या वातानुकुलीत डब्यात गेला. त्यावेळी त्यांच्यासोबत कॉन्स्टेबल चेतन सिंह आणि तीन तिकीट तपासणीस होते. त्यावेळी ASI टिकाराम मीणा यांनी कॉन्स्टेबल चेतन सिंह याची तब्येत बिघडल्याचे साक्षीदाराला सांगितले.

साक्षीदाराने चेतन सिंहला ताप आहे का तपासले पण तसे काही नव्हते. पण चेतन सिंह आपली तब्येत खराब आसल्याचे सांगत होता. तसेच आपणास वलसाड येथे उतरावे, असे ASI टिकाराम मीणा यांना सांगत होता. मात्र ASI टिकाराम मीणा यांनी त्याला समजावत, दोन तीन तासांची ड्युटी बाकी आहे. गाडी मुंबईला पोहचल्यानंतर आराम कर, असे सांगितले.

चेतन सिंह ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ASI टिकाराम मीणा यांनी इन्स्पेक्टर हरिश्चंद्र यांना मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी सदरची गोष्ट मुंबई सेंट्रल कंट्रोलला कळविण्यास सांगितले. त्यानुसार ASI टिकाराम मीणा यांनी कंट्रोलशी संपर्क साधत तेथील अधिकाऱ्यांना सदर माहिती दिली. पण अधिकाऱ्यांनी चेतनला समजावून सांगण्यास सांगितले. त्यानुसार ASI टिकाराम मीणा यांनी चेतन सिंहला पुन्हा समजावले. परंतु तो ऐकतच नव्हता.

आपणास कंट्रोलशी बोलायचे आहे, असा हट्ट त्याने धरला. म्हणून ASI टिकाराम मीणा यांनी असिस्टन्ट सिक्युरिटी कमिशनर सुजित कुमार पांडे यांच्याशी त्याचे बोलणे करुन दिले. त्यांनी देखील चेतनला समजावून सांगितले. परंतु तरीही तो ऐकत नव्हता. Asi टिकारम मीणा यांनी चेतनसाठी काही थंड पेय आणायला साक्षीदाराला सांगितले. त्यानुसार साक्षीदाराने चेतनसाठी कोल्ड्रिंक आणले, परंतु त्याने ते घेतले नाही.

ASI मिना यांनी साक्षीदाराला चेतनची बंदुक घे, त्याला आराम करु दे असे सांगितले. त्यानुसार साक्षीदार त्यास B/4 या बोगीमध्ये घेऊन गेला. तेथील एका रिकाम्या सिटवर चेतनला झोपवले. त्याची रायफल घेऊन साक्षीदार बाजूच्या सिटवर बसला. चेतन 10 ते 15 मिनिटांनी उठला आणि रायफल मागू लागला.

साक्षीदाराने रायफल देण्यास नकार देत आराम करण्यास सांगितले. मात्र चेतन चिडला आणि साक्षीदाराच्या अंगावर धावून जाऊ लागला. तरीही साक्षीदाराने त्यास रायफल दिली नाही म्हणून चेतन अधिक संतापला आणि साक्षीदाराचा गळा दाबू लागला. त्यामुळे साक्षीदाराचा नाईलाज झाला. मग चेतनने साक्षीदाराकडून रायफल काढून घेतली आणि तेथून निघून गेला.

मात्र चेतन चुकून साक्षीदाराची रायफल घेऊन गेला होता. ही बाब लक्षात येताच साक्षीदाराने सदरची घटना ASC सुजीतकुमार पांडे यांना फोन करुन कळवली. त्यांनी सदरची घटना टिम इंचार्ज यांना कळविण्यास सांगितले. त्यानुसार साक्षीदाराने ASI टिकाराम मीणा यांना शोधून सदरची घटना त्यांना सांगितली. यानंतर चेतनने रायफल परत करत स्वतःची रायफल घेतली.

स्वतःची रायफल ताब्यात घेतल्यानंतरही चेतन सिंह रागातच होता. ASI टिकाराम मीणा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तो त्यांच्याशी वाद घालत होता. साक्षीदारानेही चेतनला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कुणाचेही ऐकत नव्हता. त्यामुळे साक्षीदाराने तिथून निघून जाणे पसंत केले. तिथून निघत असताना साक्षीदाराने चेतनला रायफलचे सेफटी कॅच हटवताना पाहिले. त्यावरुन तो फायरिंग करण्याच्या मनस्थितीत आहे, असे साक्षीदाराला वाटू लागले.

साक्षीदाराने सदरची बाब ASI टिकाराम मीणा यांच्या निदर्शनास आणून दिली. मीणा यांनी चेतनच्या जवळ जाऊन त्याला आपुलकीने समजावू लागले. हे सुरु असतानाच साक्षीदार पॅन्ट्री कारमध्ये निघून गेला.

यानंतर 31 जुलै 2023 रोजी सकाळचे सुमारे 05.00 वाजून गेले होते. साक्षीदार पँट्री कारमध्ये असताना सुमारे 5.25 वाजता ट्रेन सफाळे ते वैतरणा रेल्वे स्टेशन परिसरात आली होती. त्यावेळी साक्षीदाराला नालासोपारा येथून RPF मधील बॅचमेट कॉन्स्टेबल कुलदिप राठोड याचा फोन आला. त्याने सांगितले की, टिम इंचार्ज ASI टिकाराम मीणा यांच्यावर फायरिंग झाली आहे.

ही बाब त्यास कशी कळली हे विचारले असता त्याने एसी कोच अटेंडंटने आपल्याला फोन करुन कळवल्याचे सांगितले. सदरची घटना साक्षीदाराने पोलीस हवालदार नरेंद्र कुमार यांना फोनवरुन कळवली आणि तो घाईघाईने B/5 कोचच्या दिशेने जाऊ लागला. त्यावेळी समोरुन दोन तीन पॅसेन्जर धावत आले. ते घाबरलेले दिसत होते.

ASI टिकाराम मीणा यांच्यावर त्याचा साथीदार चेतन सिंह याने गोळीबार केल्याचेप्रवाशांनी साक्षीदाराला सांगितले. साक्षीदाराने फोनवरुन ही घटना पोलीस हवालदार नरेंद्र परमार यास कळवली आणि तो सुरक्षित असल्याची खात्री करुन घेतली. तसेच सदर माहिती कंट्रोल रुमला दिली.

साक्षीदार B/5 कोचमध्ये आला असता समोरुन पोलीस शिपाई चेतन सिंह येताना दिसला. त्याच्या हातात रायफल होती आणि त्याचा चेहरा रागावलेला दिसत होता. तो आपल्यावर फायरींग करु शकतो या विचाराने साक्षीदार मागे फिरलो आणि स्लिपर कोचमध्ये येऊन थांबलो.

सुमारे 10 मिनिटांनी कोणीतरी साखळी ओढल्याने ट्रेन थांबली. त्यावेळी साक्षीदाराने ‘व्हेअर इज माय ट्रेन’ या अँपवर पाहिले असता मिरारोड व दहिसर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान ट्रेन थांबल्याचे कळले. बोगीचा पश्चिमेकडील दरवाजा अर्धवट उघडून बाहेर पाहिले असता समोर ट्रॅकवर उतरुन चेतन सिंह येताना दिसला. त्याच्या हातात रायफल तशीच होती आणि तो फायरिंग पोझिशनमध्ये होता.

साक्षीदाराने बोगीतील प्रवाशांना खिडक्या बंद करुन खाली पडून राहण्यास सांगितले. चेतनने रायफल ट्रेनच्या दिशेने ताणलेली होती. तो अधून मधून फायरिंग करत होता. साक्षीदार थोडा वेळ एका बाथरुममध्ये लपून राहिलो. थोड्या वेळाने बाहेर येऊन पाहिले असता चेतन ट्रॅकवरुन चालत मिरारोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाताना दिसला. त्याच्या हातात रायफल तशीच होती.

सुमारे 15 मिनिटे थांबल्यानंतर ट्रेन पुन्हा सुरु झाली. यानंतर साक्षीदाराने 5/6, क्रमांकाच्या बोगीमध्ये जाऊन पाहिले असता तेथे एक पॅसेन्जर रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे मला दिसून आले. तसेच पॅन्ट्री कारमध्ये देखील एक प्रवासी रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे पाहिले.

सुमारे 06.20 ला ट्रेन बोरीवली स्थानकावर येऊन थांबली असता तेथे बोरीवली रेल्वे पोलिसांनी RPF च्या मदतीने पॅन्ट्री कारमधून एक आणि 5/6 कोचमधून एक अशा दोन जखमी इसमांना आणि B/5 नंबरच्या कोचमधून आणखी दोन जखमी इसमांना अशा चार जखमी इसमांना फलाटावर उतरवून घेतले. मात्र त्यावेळी चौघांचाही मृत्यू झाला होता.

मात्र या सर्व घटनाक्रममध्ये 5 ते 5.25 या वेळेत काय घडलं हे अद्याप कळू शकले नाही. त्या 25 मिनिटांचे रहस्य कायम आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.