Mumbai : संभोग करताना मृत्यू! मुंबईच्या कुर्ला परिसरातील हॉटेलमधील घटनेनं खळबळ

Mumbai : संभोग करताना मृत्यू! मुंबईच्या कुर्ला परिसरातील हॉटेलमधील घटनेनं खळबळ
पंजाबमध्ये पॉकिट मनी कमी पडतो म्हणून मुलाकडून आई-वडिलांची हत्या
Image Credit source: TV9 Marathi

संभोग करताना अस्वस्थ वाटू लागलेल्या या पुरुषाला नंतर शुद्ध राहिली नव्हती. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पुरुषाबाबत त्याच्या प्रेयसीनं हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना कळवलं.

सिद्धेश सावंत

|

May 24, 2022 | 1:07 PM

मुंबई : संभोग (Physical Relation) करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळबळ उडालीय. ही घटना मुंबईतल्या कुर्ला (Kurla, Mumbai News) परिसरात घडली आहे. कुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये शारिरीक संबंध ठेवताना एका वयस्कर इसमाचा अचानक मृत्यू झाला. या इसमाच्या मृत्यूची माहिती कळताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तातडीनं पोलिसांना (Mumbai Police News) याबाबत कळवलं होतं. पोलिसांनी या घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करुन घेतली आहे. तसंच वैद्यकीय अहवालाचा प्रतीक्षा सध्या पोलिसांना आहे. सध्या मुंबई पोलिस या इसमाच्या मृत्यूप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तूर्तास तरी या इसमाच्या शरीरावर कोणत्याही संशस्यास्पद खुणा आढळून आलेल्या नाहीत. तसंच हिंसेच्या खुणांचीही नोंद पोलीस तपासात आढळून आली नव्हती.

नेमकं काय घडलं?

कुर्ल्यात एलबीएस रोडवर जीएसके नावाचं एक हॉटेल आहे. या हॉटेलात सोमवारी सकाळच्या सुमारास व्यक्तीनं आपल्या प्रेसयीसोबत चेक इन केलं. हॉटेलमध्ये आल्यानंतर या दोघांसोबत लैंगिक संबंध ठेवताना एक विचित्र गोष्ट घडली. लैंगिक संबंध ठेवताना पुरुषाला अस्वस्थ वाटू लागलं.

संभोग करताना अस्वस्थ वाटू लागलेल्या या पुरुषाला नंतर शुद्ध राहिली नव्हती. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पुरुषाबाबत त्याच्या प्रेयसीनं हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना कळवलं. घाबरुन गेलेल्या प्रेयसीनं अखेर पुरुषाला रुग्णालयात नेलं. सायन रुग्णालयात या व्यक्तीला आणण्यात आलं होतं. पण तिथं आणण्याआधीच हा व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अखेर रुग्णालयातील डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत घोषित करताच एकच खळबळ उडाली.

पाहा व्हिडीओ :

मृत्यू झालेल्या पुरुषाचं वय 61 वर्ष असून त्याच्या प्रेयसीचं वय 40 वर्ष असल्याचं कळतंय. या दोघांनी हॉटेलमध्ये आल्यानंतर संबंध ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुरुषास अस्वस्थ वाटू लागल्यानंतर प्रेयसीनं हॉटेलच्या रिसेप्शनला फोनवरुन याबाबत कल्पना देत त्यांची मदत मागितली. या वृद्ध इसमाची प्रेयसी असलेली महिला वरळी कोळीवाड्यात राहणारी असून ती एका खासगी कंपनी कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

मेडिकल रिपोर्टची प्रतीक्षा

या खळबळजनक मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन घेतली आहे. सध्या पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला जातो आहे. या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे का, या दृष्टीनं पोलिसांकडून चौकशी केली जाते आहे. तसंच हॉटेलमध्ये दोघांनी येताना दाखवलेल्या आयडी प्रूफचीही तपासणी केला जातेय. सध्या पोलिसांना मृत व्यक्तीच्या मेडिकल रिपोर्टची प्रतीक्षा आहे. या मेडिकल रिपोर्टमधून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. 61 वर्षांच्या या व्यक्तीच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें