नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावर 25 किलो हेरॉईन जप्त, किंमत तब्बल सव्वाशे कोटी रुपये

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Oct 08, 2021 | 1:17 PM

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) कारवाईमध्ये एका कंटेनरमधून तब्बल 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे सवाशे कोटी रुपये असल्याची माहिती आहे. हा कंटेनर नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात पकडला गेला. या प्रकरणी जयेश संघवी नावाच्या व्यावसायिकालाही अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावर 25 किलो हेरॉईन जप्त, किंमत तब्बल सव्वाशे कोटी रुपये
Drugs Seized

Follow us on

नवी मुंबई : सध्या ड्रग्जबाबतच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे. ड्रग्ज पॅडलर्सवर अंमली पदार्थविरोधी पथक दररोज कारवाई करत आहेत. त्यामुळे ड्रग्जचा व्यापार करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. विशेषतः बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरु आहे. यादरम्यान महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) कारवाईमध्ये एका कंटेनरमधून तब्बल 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे सव्वाशे कोटी रुपये असल्याची माहिती आहे. हा कंटेनर नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात पकडला गेला. या प्रकरणी जयेश संघवी नावाच्या व्यावसायिकालाही अटक करण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, नवी मुंबईतील एक 62 वर्षीय व्यापारी इराणमधून शेंगदाणा तेलाच्या खेपेत 25 किलो हेरॉईनची तस्करी करत होता. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबईच्या न्हावा शेवा येथे इराणहून आलेल्या एका कंटेनरला ताब्यात घेतले आणि 4 ऑक्टोबर रोजी त्याचा शोध घेतला.

दोन महिलांना 5 किलो हेरॉईनसह अटक

गेल्या महिन्यात दोन महिलांना कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर सुमारे 5 किलो हेरॉईनसह अटक केली होती. जप्त केलेल्या डग्जची किंमत सुमारे 25 कोटी रुपये होती. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून आलेल्या आई आणि मुलीला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी पकडले होते. दोघांनीही हेरोईन त्यांच्या ट्रॉली बॅगच्या बाजूच्या खिशात लपवून ठेवले होते. त्यांच्याकडून 4.95 किलो हेरॉईन सापडले होते. विमानतळावर कोणत्याही व्यक्तीकडून ड्रग्जची ही सर्वात मोठी जप्ती असल्याचे सांगितले जात आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की विमानतळावरील ही सर्वात मोठी जप्ती आहे कारण प्रवासी सहसा एका वेळी दोन किलोपेक्षा जास्त डग्ज घेऊन जात नाहीत. अटकेनंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

यावर्षी जानेवारीपासून मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांशी संबंधित 3,333 गुन्हे नोंदवले आहेत, तर3,575 लोकांना अटक केली आहे आणि 86.50 कोटी रुपये किंमतीचे 3,813 किलो विविध प्रतिबंधित मादक पदार्थ जप्त केले आहेत. ANC ने यापैकी 88 प्रकरणे नोंदवली आहेत. या प्रकरणांमध्ये 129 लोकांना अटक करण्यात आली आणि 60.16 कोटी रुपये किमतीचे 2,569 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

संबंधित बातम्या :

Cruise Drugs Party | ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, NCB अधिकाऱ्यांनी आर्यनला काय विचारलं? वकिलांनी सांगितला सर्व घटनाक्रम

Aryan Khan | आर्यन खानला ‘जेल की बेल’? NCB च्या कोठडीबाबत कोर्टात फैसला होणार

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI