Raj Kundra | राज कुंद्राच्या कार्यालयात सापडला सर्व्हर, डर्टी पिक्चरचे ‘काळेधंदे’ उघड होणार?

Raj Kundra | राज कुंद्राच्या कार्यालयात सापडला सर्व्हर, डर्टी पिक्चरचे 'काळेधंदे' उघड होणार?
Raj Kundra

पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. (Raj Kundra case: police seize server from office shilpa shetty husband)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jul 21, 2021 | 7:03 PM

मुंबई: पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून अ‍ॅप आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक कंटेंट अपलोड करण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे. आयटी तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस हे सर्व्हर खंगाळून काढून कुंद्रा यांच्या डर्टी पिक्चरचे काळेधंदे उघड करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Raj Kundra case: police seize server from office shilpa shetty husband)

पोलिसांच्या हाती लागलेल्या या सर्व्हरमधून कुंद्रा यांची पूर्ण पोलखोल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी त्याचे फोनही जप्त केले आहेत. तसेच हे फोन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. राज कुंद्रा याची पोलखोल करण्यासाठी फोन आणि सर्व्हर या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचंही सांगितलं जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटींग

राज कुंद्राच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. H नावानं त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार केला होता. या ग्रुपचा तो अ‍ॅडमिन होता. या ग्रुपमध्ये केवळ चारच लोक होते. या ग्रुपमध्ये मॉडल्सचे पेमेंट आणि रेव्हेन्यूच्याबाबत चर्चा केली जात होती. आता आणखी नवी माहितीही पोलिसांच्या हाती आली आहे.

यातील एक चॅट 10 नोव्हेंबर 2020मधील आहे. यात एका वृत्तपत्राचं कात्रण शेअर करण्यात आलं आहे. पॉर्न कंटेट दाखवणाऱ्या सात ओटीटी प्लॅटफॉर्म्सला समन्स बजावल्याची ही बातमी आहे. या बातमीवर ” Thank God U Planned BF” असं उत्तर देण्यात आलंय. त्यानंतर कुंद्रा यांनी काही दिवसांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून बोल्ड कंटेट हटवण्याच्या सूचनाही सहकाऱ्यांना दिल्या. तसेच हॉटशॉट्सला पर्याय निर्माण करण्यासाठी काही तरी मार्ग काढला पाहिजे, असंही त्याने या चॅटमध्ये म्हटलं आहे.

त्यावर एकजण म्हणतो, पोलीस ऑल्ट बालाजीला टेक डाऊन करू शकतील, असा मला संशय आहे. या सहकाऱ्याचा संशय कुंद्रा फेटाळून लावतो. तो म्हणतो, हे एवढं गंभीर नाही. केवळ आक्षेपार्ह कंटेंट त्यांना नको आहे. पण आपलं चांगलं चाललं आहे.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे. (Raj Kundra case: police seize server from office shilpa shetty husband)

संबंधित बातम्या:

Raj Kundra case : राज कुंद्रांच्या बँक खात्यात रोज लाखो रुपयांचं डिपॉझिट! आकडेवारी जाणून तुम्हीही हैराण व्हाल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक, कारण काय?

अभिनेत्री गहना वशिष्ठच्या चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत, शिल्पा शेट्टीचा नवरा अश्लील चित्रपट प्रकरणात कसा सापडला?

(Raj Kundra case: police seize server from office shilpa shetty husband)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें