मुंबईत ‘सेक्स टुरिझम रॅकेट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; दोन महिला दलालांना अटक

अबरून ही तरुणींना घेऊन विमानतळावर येणार असल्याने श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. अबरून हिच्यासोबत वर्षा परमार ही महिला देखील आली होती.

मुंबईत 'सेक्स टुरिझम रॅकेट'चा धक्कादायक प्रकार उघडकीस; दोन महिला दलालांना अटक
मुंबईत 'सेक्स टुरिझम रॅकेट'चा धक्कादायक प्रकार उघडकीस

मुंबई : मुंबई पोलिसांमुळे देहव्यापार करणे कठीण जात असल्याने तरुणींना गोव्याला नेण्यात येत असतानाच पोलिसांनी कारवाई करीत सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबईहून गोव्याला रवाना होत असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिला दलालांना विमानतळाजवळ अटक केली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अबरुन खान आणि वर्षा परमार अशी अटक करण्यात आलेल्या महिला दलालांची नावे आहेत. या महिला दलालांच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. (sex tourism racket exposed in Mumbai; Two female brokers arrested)

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केली कारवाई

अबरुन खान ही अंधेरीतील साकीनाका परिसरात राहत असून, देहव्यापाऱ्यासाठी तरुणी पुरवते अशी माहिती गुन्हे शाखा युनिट 7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार श्रीधनकर यांनी महिलांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार श्रीधनकर यांनी बोगस ग्राहक तयार करून अबरून हिच्याशी संपर्क साधत दोन तरुणी पाहिजे असल्याचे सांगितले. मात्र मुंबईत पोलिसांचे छापे पडत असल्याने तरुणी येण्यास तयार नसल्याचे अबरून हिने ग्राहकाला सांगितले. यामुळे तरुणींना घेऊन गोव्याला जाण्याचे ठरले. एका तरुणीसाठी 50 हजार रुपये आणि तेवढेच कमिशन देण्याचे ठरले. त्यानुसार गोव्याला जाण्यासाठी विमानाचे तिकीटही बुकिंग करण्यात आले.

अबरून ही तरुणींना घेऊन विमानतळावर येणार असल्याने श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. अबरून हिच्यासोबत वर्षा परमार ही महिला देखील आली होती. पोलिसांनी सीआयएसएफ जवानांच्या मदतीने परमारलाही ताब्यात घेत दोघींच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका केली. अबरुन खान आणि वर्षा परमार दोघींनाही सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पिंपरीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेल्या या गैर प्रकारातून चार महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी स्पा सेंटर मालक महिला आणि मॅनेजर रनवीर रामनरेश राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारुन कारवाई केली. कस्पटे वस्ती वाकड येथे ‘ट्रॅको ट्रीट स्पा’ नावाचे स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये आरोपींनी चार महिलांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी ठेवले होते. महिलांना पैशांचे अमिष दाखवून आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचा आरोप आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली. चार महिलांची सुटका करुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (sex tourism racket exposed in Mumbai; Two female brokers arrested)

इतर बातम्या

एका महिलेकडून 21 कोटींचं ड्रग्ज जप्त, क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

Aryan Khan : आर्यन खानची मुंबई हायकोर्टात धाव, विशेष NDPS कोर्टाच्या निर्णयाला आव्हान, दिलासा मिळणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI