बदनामी केल्याचा मनात राग, जमिनीवर डोकं आपटून काटा काढला, उल्हासनगरात माथेफिरुला बेड्या

सतत बदनामी करत असल्यामुळे मनात राग धरत एका माथेफीरुने तरुणाची हत्या केली. उल्हासनगरातील कॅम्प 4 भागातील मराठा सेक्शन परिसरात ही हत्या झाली. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव राहुल असून किरण म्हात्रे असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बदनामी केल्याचा मनात राग, जमिनीवर डोकं आपटून काटा काढला, उल्हासनगरात माथेफिरुला बेड्या
ULHASNAGAR MURDER
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 10:16 PM

ठाणे : सतत बदनामी करत असल्यामुळे एका माथेफिरुने तरुणाची हत्या केली. उल्हासनगरातील कॅम्प 4 भागातील मराठा सेक्शन परिसरात ही हत्या झाली. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव राहुल असून किरण म्हात्रे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सततच्या बदनामीमुळे तरुणाची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या कॅम्प 4 भागातील मराठा सेक्शन परिसरात किरण म्हात्रे आणि राहुल हे दोघे वास्तव्याला होते. यापैकी राहुल आपली सतत बदनामी करत असल्याचा राग किरण म्हात्रे याला होता. याच रागातून रविवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास किरण म्हात्रे याने शनिमंदिर परिसरात राहुल याला जबर मारहाण केली.

न्यायालयाने ठोठावली पोलीस कोठडी

किरण म्हात्रे याने राहुलचे डोके जमिनीवर जोरजोरात आपटले. या मारहाणीत डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे राहुल याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करत पोलिसांनी आरोपी किरण म्हात्रे याला बेड्या ठोकल्या. तसेच पोलिसांनी आरोपी किरणला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

बलात्कार करुन मुंबईत तरुणीची हत्या

दरम्यान, अशीच एक हत्या मुंबईत 27 नोव्हेंबर रोजी घडली होती. 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. कुर्ला भागातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर तरुणी मृतावस्थेत आढळली होती. इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना या युवतीचा मृतदेह सर्वप्रथम आढळला होता. पीडित तरुणी नेमकी कोण आहे, तिच्यावर बलात्कार करणारे आरोपी कोण आहेत, याविषयी अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

इतर बातम्या :

Pimpri-Chinchwad crime| पिंपरीत वाहन चोरांचा सुळसुळाट ; एका दिवसात ७ दुचाकीसह एका टेम्पोवर चोरांचा डल्ला

कुख्यात गँगस्टर अमित भोगलेला बेड्या, दोन देशी पिस्तूल, 8 जिवंत काडतुसे, शस्त्र जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई!

धक्कादायक: बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराची दगडाने ठेचून हत्या, शेगावच्या अग्रसेन चौकातील घटना

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.