धक्कादायक: बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराची दगडाने ठेचून हत्या, शेगावच्या अग्रसेन चौकातील घटना

घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.

धक्कादायक: बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराची दगडाने ठेचून हत्या, शेगावच्या अग्रसेन चौकातील घटना
पत्नी व मुलाची हत्या करुन पतीची आत्महत्या

बुलढाणा : बिडी दिली नाही म्हणून एका हॉटेल कामगाराची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात घडली आहे. जयवंत देशमुख असे मयत कामगाराचे नाव असून तो अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मयत जयवंत शहरातील सत्कार भोजनालयात होता कामाला

मयत जयवंत देशुमख हा शेगाव शहरातील सत्कार भोजनालय येथे काही दिवसांपासून कामाला होता. आरोपी संतोष बाळू सरोदे हा तेथे पाणी आणि बिडी मागण्यासाठी गेला होता. मात्र मयत जयवंतने संतोषला पाणी आणि बिडी दिली नाही. यामुळे आरोपी संतोष संतप्त झाला. याच रागातून त्याने जयवंतला दगडाने ठेचून ठार केले. शेगाव शहरातील श्री अग्रसेन चौक येथील दार्जिलिंग चहाच्या दुकानासमोर ही घटना घडली. या दुकान मालकाने घटनेची माहिती शेगाव शहर पोलिसांना दिली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या युवकाची कसून चौकशी केली असता मयताने आपल्याला पाणी आणि बिडी देण्यास नकार दिल्याने आपण दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. तर दुसरीकडे पोलिसांच्या श्वानानेही आरोपीला ओळखले. (Hotel worker stoned to death for not giving bidi in buldhana)

इतर बातम्या

Jalgaon | ‘करणी केल्यानेच गाय मेली,’ ओल्या वस्त्रानिशी महिलेला मूर्तीवर टाकायला लावले पाणी

नागपूर हवालाचे गुजरात कनेक्शन, 98 लाखांवर रक्कम जप्त, तपासात लागली ईडी, आयटी

Published On - 6:14 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI