मित्राच्या शरीराचे 11 तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले, खुनी नवरा-बायकोला बेड्या

मित्राची हत्या करुन त्याच्या शरीराचे 11 तुकडे करून सुटकेसमधून फेकणाऱ्या आरोपीला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. |

मित्राच्या शरीराचे 11 तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले, खुनी नवरा-बायकोला बेड्या
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 9:13 PM

रायगड : मित्राची हत्या करुन त्याच्या शरीराचे 11 तुकडे करून सुटकेसमधून फेकणाऱ्या आरोपीला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. 16 डिसेंबर 2020 रोजी नेरळ रेल्वे स्टेशन जवळच्या नाल्यात एक मानवी अवयव मिळाला होता. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची पाहणी केली असता तेथे दोन सुटकेस सापडल्या. त्या उघडून पाहिल्या असता त्यात पुरुषाच्या शरीराचे अकरा तुकडे सापडले. यानंतर एकच खळबळ उडाली होती. नेरळ पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने तपास सुरु केला. अखेर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. चार्ल्स नाडर आणि त्याची पत्नी सलोमी पेडराई अशी आरोपींची नावं आहेत (Murder of Friend 11 pieces of deadbody in Neral Raigad).

नेरळ पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी 7 पथकं स्थापन करण्यात आलीत. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासात एका व्यक्तीबाबत संशय व्यक्त केला जात होता. संशयित व्यक्तीच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात रक्ताचे कपडे सापडले. मात्र, संशयित व्यक्ती फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत व्यक्तीचं नाव सुशीलकुमार सरनाईक आहे. तो वरळीतील गांधीनगर येथे राहत होता. मृत सुशील हा सलोमी हिचा मित्र आहे. सुशील हा चार्ल्सच्या घरी आला होता. तेथे सर्व दारू प्यायले. त्यानंतर सुशीलने चार्ल्सच्या पत्नीच्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर चार्ल्सला या बोलण्याचा राग आला आणि त्याने सुशीलची हत्या केली. हत्येनंतर त्याच्या शरीराचे अकरा तुकडे केले आणि ते नाल्यात फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा :

खून नवी मुंबईत, आरोपी बांगलादेशात, तरीही मुसक्या आवळल्या, कशा?

अल्पवयीन तरुणाची निर्घृण हत्या, कराड हादरले

भर दुपारी शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू, पतीनेही विष पिल्याने गुंता वाढला; मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान

Murder of Friend 11 pieces of deadbody in Neral Raigad

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.