Nagpur Fraud : नागपूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची 1 लाख 38 हजाराची फसवणूक, अजनी पोलिसात गुन्हा दाखल

तरुणीला कस्टमर सर्विसकडून फोन असल्याचे भासवून क्रेडिट कार्डवरील प्लान बंद करण्याची प्रोसेस सांगत ओटीपी मागितला. त्यानंतर ओटीपी मिळाल्यानंतर तिच्या खात्यातून पैसे वळते केले.

Nagpur Fraud : नागपूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची 1 लाख 38 हजाराची फसवणूक, अजनी पोलिसात गुन्हा दाखल
नागपूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची 1 लाख 38 हजाराची फसवणूक
Image Credit source: TV9
सुनील ढगे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 19, 2022 | 7:29 PM

नागपूर : नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन हद्दीत एका सॉफ्टवेअर इंजिनियर (Software Engineer) असलेल्या तरुणीची एक लाख 38 हजार रुपयाची फसवणूक (Fraud) झाल्याचे उघडकीस आले आहे. तरुणीला कस्टमर सर्विसकडून फोन असल्याचे भासवून क्रेडिट कार्डवरील प्लान बंद करण्याची प्रोसेस सांगत ओटीपी मागितला. त्यानंतर ओटीपी मिळाल्यानंतर तिच्या खात्यातून पैसे वळते केले. खात्यातून पैसे काढल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने अजनी पोलीस ठाणे (Ajani Police Station) गाठत फसवणुकीची तक्रार दाखल केली. साक्षी विंचुरकर असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत अजनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तांत्रिक पद्धतीने सीडीआर काढून आरोपीचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण ?

साक्षी विंचुरकर ही तरुणी एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. या तरुणीला 5 ऑगस्ट रोडी श्रेया शर्मा नामक महिलेचा कॉल आला. सदर महिलेने क्रेडिट कार्डवरील प्रोटेक्शन प्लॅन सुरू ठेवायचा असेल तर दोन हजार रुपये भरावे लागतील अशी माहिती साक्षीला दिली. मात्र आपल्याला कुठलाही प्लॅन सुरू ठेवायचा नाही असे साक्षीने तिला सांगितले. त्यानंतर समोरील महिलेने प्लॅन निष्क्रिय करण्यासाठी प्रक्रिया सांगितली. त्यानुसार मोबाईलवर आलेला ओटीपी साक्षीने सदर महिलेला दिला. ओटीपी दिल्यानंतर काही वेळातच साक्षी यांच्या खात्यात दोन लाख 12 हजार रुपये जमा झाले. याबाबत साक्षी यांनी विचारणा केली असता पर्सनल लोन जमा झाले आहे असे सांगण्यात आले.

आपण कुठल्याही कर्जासाठी अर्ज केला नसल्याचे साक्षी हिने सांगितले. त्यानंतर थोड्या वेळात तिच्या खात्यातून एक लाख रुपये डेबिट झाले. त्यानंतर 38 हजार रुपये अजून डेबिट झाले. आपल्या खात्यातून एक लाख 38 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समजताच तिने अजनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेत आहेत. ऑनलाईन फ्रॉड करणारे कुठल्याही स्थराला जाऊ शकतात. शिक्षित माणसाला सुद्धा गंडा घालू शकतात, हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. (1 lakh 38 thousand fraud of a young software engineer in Nagpur)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें