Buldana Accident CCTV : युटर्न मारण्याआधी मागे पाहिलं असतं तर..? बुलडाण्यातील रिक्षा-बाईकचा थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद

Buldana Accident News : रस्त्यावर फारशी वाहनं नाहीत, असं पाहून रिक्षा चालकानं यु टर्न मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिक्षातही काही प्रवासीही होती. दरम्यान, नेमक्या याच क्षणी मागून भरधाव वेगाने दोघे जण बाईकवरुन येत होते.

Buldana Accident CCTV : युटर्न मारण्याआधी मागे पाहिलं असतं तर..? बुलडाण्यातील रिक्षा-बाईकचा थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद
गणेश सोळंकी

| Edited By: सिद्धेश सावंत

Aug 18, 2022 | 7:07 AM

बुलडाणा : राज्यातील अपघातांची (Maharashtra Accident News) मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. रविवारी मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या विनायक मेटे (Vinayak Mete Accident News) यांच्या कार अपघातातील मृत्यूनंतर राज्यात रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. अशातच काळजाचा ठोका चुकवणारं अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज (Buldana Accident CCTV Video) समोर आलंय. या अपघातात दोघे जण जखमी झालेत. तर बाईकचंही नुकसान झालंय. हा अपघात इतका भीषण होता, की बाईकच्या धडकेत रिक्षा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सरकली तर बाईकसह बाईकस्वारही जागच्या जागी कोसळले. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव-वाडी इथं रिक्षा आणि दुचाकीचा हा अपघात घडली. रिक्षा इथं ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडला. दोघे दुचाकीस्वार भरधाव वेगाने बाईकवर येत होते. त्याच वेळी अनपेक्षितपणे घडलेल्या या अपघाताची घटना काळजाचा ठोका चुकवणारी होती. खामगाव येथील दीपाली नगर इथं हा अपघात घडला. या अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. या अपघातात दोघेजण जखणी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर पोलिसांनीही या अपघाताची नोंद केली असून सध्या पुढील तपास सुरु आहे. बुधवारी सकाळी 8.12 मिनिटांनी अपघाताची ही घटना घडली.

त्यामुळे अनर्थ टळला..!

दरम्यान, ज्यावेळी ही अपघात घडला, त्यावेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. शिवाय रस्त्यावरुन समोरच्या बाजूनेही कोणतंही वाहन येत नव्हतं. नाहीतर आणखी मोठी दुर्घटना होण्याची भीती होती.

जीवघेण युटर्न

रस्त्यावर फारशी वाहनं नाहीत, असं पाहून रिक्षा चालकानं यु टर्न मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिक्षातही काही प्रवासीही होती. दरम्यान, नेमक्या याच क्षणी मागून भरधाव वेगाने दोघे जण बाईकवरुन येत होते. रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या उद्देशाने बाईकस्वारही उजव्या बाजूच्या लेनने जाताना दिसतो. मात्र रिक्षावाला मारेपुढे न पाहता युटर्न मारण्यासाठी हॅन्डल फिरवतो आणि ज्याची भीती असते, नेमकं तेच घडलं. बाईक आणि रिक्षा यांची जोरदार धडक होते. ही धडक इतकी भीषण असते की रिक्षा चक्क विरुद्ध दिशेलाच फिरते. तर दोघेही बाईकस्वार धडकेत बाईकसह खाली कोसळतात आणि जागच्या जागी पडतात.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

या अपघातानंतर रिक्षा चालकासह प्रवासी महिलाही खाली उतरतात आणि जखमी झालेल्या दुचाकीस्वारांच्या दिशेने धाव घेतानाही व्हिडीओ दिसून आल्या आहेत. या अपघाताची माहिती कळताच पोलीसही घटनास्थळी दाखल होतात. पोलिसांनी या अपघाताची पाहणी करुन घेतला असून पुढील तपास केला जातोय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें