नागपूरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, चार आरोपी अटकेत

या गँगरेप प्रकरणात एकूण सात आरोपी असून यात मुलीच्या मित्रासह चार जणांना अटक करण्यात आली आहे तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी मुलीची मेडिकल चाचणी करून घेतली असून ती ठीक असल्याचं सांगितलं.

नागपूरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, चार आरोपी अटकेत
minor girl
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 10:23 PM

नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुन्ह्यात एकूण सात आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी सातपैकी चार आरोपींना अटक केली असून अन्य तीन संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे नागपूर शहरात नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Gang rape of a minor girl in Nagpur, four accused arrested)

नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील इससानी मिहान मार्गावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी अचानक तिथे पोहचलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी मित्राला मारहाण करून मुलीवर सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. पण पोलीस तपास करत असताना मुलीच्या मित्रानेच पैसे घेऊन मुलांना बोलावले असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या गँगरेप प्रकरणात एकूण सात आरोपी असून यात मुलीच्या मित्रासह चार जणांना अटक करण्यात आली आहे तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी मुलीची मेडिकल चाचणी करून घेतली असून ती ठीक असल्याचं सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड मुलीचा मित्र असल्याचे उघड झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूरमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नागपूर : कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपीला सापळा रचून पोलिसांनी अटक केली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली. आकाश साहू असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नवीन नागपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनीष नगर मधील भागात ओयोची सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये आकाश वेश्याव्यवसाय चालवत होता. गेल्या अनेक दिवसांपासून काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर क्राईम ब्रांचने सापळा रचून आरोपीला अटक केली.

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला होता. त्याच्यामार्फत मुलीचा सौदा केला. त्या भागात अशा प्रकारचा व्यवसाय होते याची खात्री पटताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी कार्यवाही केली. महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणारा आरोपी आकाश शाहूला अटक करत दोन महिलांची सुटका केली. यापैकी एक 23 वर्षीय मुलगी नागपूरची असून दुसरी मुलगी कोलकात्यावरून या व्यवसायासाठी बोलविण्यात आली होती. आरोपी शाहू याचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासून पोलीस पुढील कार्यवाही करत आहे. नागपुरात गेल्या काही दिवसात असे गुन्हे मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत.

पुण्यात कामगार महिलेला डोंगरावर नेत तिच्यासोबत भयावह कृत्य

महिलेला काम देतो असं सांगत तिला फसणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपीच्या कर्नाटकातल्या गावात जावून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी फक्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीवरुन या गुन्ह्याचा खुलासा करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचं श्रीनिवास गणेश जाधव असं नाव आहे. (Gang rape of a minor girl in Nagpur, four accused arrested)

इतर बातम्या

साडेतीन कोटींचा चरस-गांजा, नेपाळी प्रवासी आणि पुणे ग्रामीण पोलीस, मुंबई-गोवा हायवेवर धरपकड, गुन्ह्यात पाकिस्तानचंही कनेक्शन?

दोन दिवस शेअर बाजारात 4.16 लाख कोटी रुपयांसह गुंतवणूकदार झाले मालामाल

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.